म्हापसा : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर गोव्याच्या कोमुनिदादच्या प्रशासकांनी सांगोल्डा

.

म्हापसा : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर गोव्याच्या कोमुनिदादच्या प्रशासकांनी सांगोल्डा येथील कोमुनिदाद मामलत्तेवरील तब्बल २२ बांधकामे पाडण्याचे काम शुक्रवारी (ता.१२) हाती घेतले. येत्या २५ एप्रिलपर्यंत या डिमोलिशनचा अनुपालन अहवाल सादर करायचा आहे. दरम्यान, दुपारपर्यंत १२ बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली.सांगोल्डा येथील कोमुनिदाद जागेत तब्बल २२ अनधिकृत बांधकामे उभारली होती. ही घरे बेकायदेशीर असल्याचा ठपका स्थानिक कोमुनिदादने ठेवला होता. २०१२ पासून कोमुनिदाद व या घरमालकांमध्ये कायदेशीर लढाई सुरू होती. येथील सर्व्हे क्र. ८१/१मधील ही २२ बांधकामे पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिला होता. याविषयी या घरमालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकार्‍यांनी ही बांधकामे हटविण्याचा आदेश काढला. उपजिल्हाधिकारी हे उत्तर गोवा डिमोलिशन पथकाचे प्रभारी सुद्धा आहेत. तसेच उपजिल्हाधिकार्‍यांनी उत्तर विभाग कोमुनिदाद प्रशासकांना डिमोलिशन पथक सदर अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी आज शुक्रवारी उपलब्ध करुन दिले. त्यानुसार, सकाळी ९.३० वाजता डिमोलिशन पथक व मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी हजर झाला.यावेळी डिमोलिशन पथक व उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासनाने या घरमालकांना घरातील साहित्य बाहेर काढण्यासाठी वेळ दिला. सुरवातीला काहींनी यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे महिलावर्गाने मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. मात्र विरोधास न जुमानता हे डिमोलिशनचे काम राबविण्यात आले. यावेळी घरात वास्तव्य करणार्‍यांनी आपापले साहित्य बाहेर काढले, हे काम करतेवेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. काहींनी प्रशासन तसेच सरकारला शिव्याशाप देत टाहो फोडला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar