*बिट्स पिलानीने सर्जनशील उपक्रमांसाठी गोव्यातील आपल्या कॅम्पसमध्ये अत्याधुनिक, भविष्यकालीन एसएसएस मीडिया लॅबचे केले उद्घाटन*
*संस्थेतील विविध अभ्यासक्रमांसाठी उच्च गुणवत्तेच्या ऑडियो आणि व्हिडिओ मजकूराची निर्मिती करून शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्याचे उद्दिष्ट*
*गोवा, April 13, 2024* – नवोन्मेषासाठी प्रसिद्ध असलेल्या पिलानी संस्थेने आज आपल्या गोवा कॅम्पसमध्ये मानव्यविद्या आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या नेतृत्वात नाविन्यपूर्ण एचएसएस मीडिया लॅबच्या उद्घाटनाची घोषणा केली. CC 122/1&2 मध्ये स्थित असलेल्या या लॅबचे बिट्स पिलानीचे कुलगुरू आदरणीय प्रो. व्ही. रामगोपाल राव आणि गोवा कॅम्पसचे संचालक प्रो. सुमन कुंडू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
सृजनात्मक शोधासाठी भविष्यातील हब म्हणून संकल्पना आणि निर्मिती करण्यात आलेली ही एचएसएस मीडिया लॅब प्रगत ऑडिओ, व्हिडिओ आणि ॲनिमेशन संसाधनांनी सुसज्ज आहे. मूळात 15 वर्षांपूर्वी लँग्वेज लॅब म्हणून तिची स्थापना करण्यात आली होती. ती आता एक गतिशील सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित झाली आहे. विभागात नवोन्मेष आणि सक्रिय शिक्षणाचा त्यातून चालना दिली जात आहे, हे विशेष.
अंतराळ यानाच्या थीमवर डिझाइन करण्यात आलेल्या या मीडिया लॅबमध्ये एक पूर्णपणे समर्पित शूट फ्लोअर, नियंत्रण कक्ष आणि ध्वनिरोधक व्होकल बूथ द्विस्तरीय इन्सुलेशनसह सुसज्ज आहे. त्यातील शूट फ्लोअर विविध कामांसाठी उपयोगात येतो. त्याचे लेक्चर रूम, स्क्रीनिंग रूम, पॉडकॉस्ट स्ट्युडिओ आणि इतरही कामांत रूपांतर केले जाऊ शकते. कंट्रोल रूम ही वैविध्यपूर्ण रेकॉर्डिंग स्टेशन आहे. व्होकल बूथ आदर्श व्हाइस रेकॉर्डिंग आणि ऑडिओ निर्मितीसाठी आदर्श कार्यस्थळ उपलब्ध करून देतो. कोचीतील डायमेन्शन्स ऑकॉस्टिक्स (डीए) यांनी या लॅबचे डिझाइन तयार केलेले आहे. श्रीयुत दिनेश एस हे डीएचे प्रोप्रायटर आहेत. श्रीयुत जीतू जॉर्ज हे साउंड इंजिनिअर आणि ॲकेडेमिक हेड, ऑडिओ इंजिनिअरिंग, म्युझिक टेक्नॉलॉजी, म्युझिक लाऊंज स्कूल ऑफ ऑडिओ टेक्नॉलॉजी, चेन्नई यांनीही लॅबच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे,
संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रस्तावित अभ्यासक्रमांसाठी उच्च गुणवत्तेच्या ऑडिओ आणि व्हिडिओ सामग्रीच्या निर्मितीद्वारे शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे हे एचएसएस मीडिया लॅबचे सर्वात पहिले काम आहे. हे केंद्र प्रत्येक सेमिस्टरमध्ये जवळपास 250 विद्यार्थ्यांना आपल्या सेवा प्रदान करणार आहे. त्यात लघुपट निर्मिती, सिनेमॅटिक आर्ट, साहित्य आणि सिनेमा तुलना, इकोक्रिटीसिझम आणि सांस्कृतिक अभ्यास अशा सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
इतकेच नव्हे तर, ही मीडिया लॅब महत्त्वपूर्ण अभिलेखाचेही काम करणार आहे. गेल्या कित्येक वर्षांत विद्यार्थी आणि शिक्षकवृंदांकडून तयार करण्यात आलेल्या ऑडिओ-व्हिडिओ सामुग्रीचे येथे जतन केले जाणार आहे. हा व्यापक संग्रह संस्थेच्या डिजिटल इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो. तो सहजपणे पुन्हा हाताळता यावा आणि संदर्भासाठी सुव्यवस्थित करण्यात आला आहे.
भविष्याकडे पाहता, विभाग एचएसएस मीडिया लॅबला एक सांस्कृतिक केंद्राच्या रूपपात विकसित करण्याचा हेतू समोर ठेवत आहे, जो गोव्यावर विशेष लक्ष देण्यासोबतच संस्कृती आणि कलांचे दस्ताऐवजीकरण करेल. तसेच त्या प्रकाशझोतात याव्या म्हणून स्थानिक कलाकार, वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य करतील.
यावेळी बिट्स पिलानीचे कुलगुरू प्रो. व्ही. वेणूगोपाल राव म्हणाले की, “गोवा कॅम्पसमध्ये एचएसएस मीडिया लॅबचे उद्घाटन करताना मला खूप उत्साहित वाटत आहे. ही अत्याधुनिक सुविधा शिक्षणाच्या क्षेत्रात नवोन्मेष आणि सृजनशीलतेला चालना देण्याप्रती आमच्या समर्पणाचे प्रतीक आहे. ही लॅब विद्यार्थ्यांना मीडिया निर्मितीत नव्या क्षीतिजांचा शोध घेण्यात आणि त्यांच्या शिकण्याचा अनुभव द्वीगुणित होण्यासाठी आणखी सक्षम करेल.”
बिट्स पिलानी, केके बिर्ला गोवा कॅम्पसचे संचालक प्रो. सुमन कुंडू यांनीही आनंद व्यक्त केला. या नवोन्मेषी सुविधा केंद्राला साकार करण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे त्यांनी कौतुक केले. मानव्यविद्या आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या नेतृत्वाखाली कॅम्पसमध्ये शिक्षण, संशोधन आणि सृजनशीलतेवर लॅबच्या परिवर्तनकारी प्रभावावर त्यांनी भर दिला. “हा आमच्या सुसज्जित मुकुटातील आणखी एक दागिना आहे,” असे त्यांनी या वेळी सांगितले.