इथे होते परिवर्तनाची सुरुवात JdV बाय हयातचा भाग असलेल्या रोनील गोवा येथे समाज तसेच पर्यावरणाच्या कल्याणाकरिता उपक्रम –

.

इथे होते परिवर्तनाची सुरुवात
JdV बाय हयातचा भाग असलेल्या रोनील गोवा येथे समाज तसेच पर्यावरणाच्या कल्याणाकरिता उपक्रम –

गोवा, 22 एप्रिल 2024: रोनिल गोवा हे भारत आणि नैऋत्य आशियातील पहिले JdV बाय हयात हॉटेल असून
अतिथी क्षेत्रात शाश्वततेसाठी वचनबद्ध आहे. जैव-विघटनशील अतिथी सुविधांपासून ते स्नानगृहांमधील मोठ्या स्वरूपाच्या वितरकांपर्यंत, व्हीआरव्ही प्रणाली, मोशन सेन्सर मॉनिटर्ड लाइटिंग, पाण्याच्या पुनर्वापरापासून ते लाकडी की कार्डपर्यंत आणि स्थानिक समुदाय तसेच विक्रेत्यांना पाठिंबा देणे – येथे सस्टेनेबिलिटी हा एक कार्यक्रम नसून जीवन जगण्याचा मार्ग आहे.

“हयात प्रॉपर्टीच्या पहिल्या संयुक्त उपक्रमात आम्ही जे काही करतो, त्याची गुंफण रोनिल गोवा’च्या वर्ल्ड ऑफ केअरच्या वचनबद्धतेभोवती म्हणजे ग्रह, लोक आणि व्यवसायाची देखभाल करण्यासाठी हयातच्या जागतिक दृष्टिकोनाशी निगडीत आहे. भारतातील पहिल्या JdV बाय हयात हॉटेलमध्ये, आम्ही केवळ जीवनशैली म्हणून शाश्वतता स्वीकारणार नाही तर शाश्वततेसाठी वचनबद्ध असलेल्या स्थानिक व्यवसायांनाही पाठिंबा देऊ याची सुनिश्चितता आम्ही बाळगली आहे”, असे JdV बाय हयातचा भाग असलेल्या रोनील गोवाच्या जनरल मॅनेजर प्रतीती राजपाल म्हणाल्या.

रोनिल गोवा येथील काही शाश्वत पद्धती येथे दिल्या आहेत –

ऊर्जा कार्यक्षमताः एचव्हीएसी प्रणालींसाठी गैर-सीएफसी उपकरणे वापरून ऊर्जा संवर्धन. पारंपरिक बॉयलरऐवजी हिट पंपांचा वापर केल्याने केवळ कार्बन उत्सर्जन कमी होत नाही तर कार्यक्षम गरम पाणी निर्मिती देखील सुनिश्चित होते. सौर वॉटर हिटर पॅनेलचे एकत्रीकरण उर्जेचा वापर अधिक अनुकूल करते. ज्यामुळे अक्षय स्रोतांचा वापर करण्यासाठी रिसॉर्ट कायम समर्पित आहे.

कचरा व्यवस्थापनः आमचे बुटीक रिसॉर्ट आणि मुक्त उत्साही टीम कचरा पृथक्करण पद्धतींद्वारे कचरा कमी करणे आणि पुनर्वापरासाठी वचनबद्ध आहेत. ओल्या आणि कोरड्या कचऱ्याचे योग्य पृथक्करण करून, विल्हेवाट लावण्यापूर्वी अन्नपदार्थांचा समावेश असलेल्या कचऱ्याची कार्यक्षम प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी समर्पित वेट पल्व्हरायझ मशीनसह योग्य विल्हेवाट आणि पुनर्वापर सुनिश्चित करतो.

सांडपाणी व्यवस्थापनः आम्ही जल प्रदूषण कमी करतो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या इष्टतम प्रक्रियेद्वारे पाण्याची बचत पुनर्चक्रित पाण्याचा वापर (STP)च्या माध्यमातून संपूर्ण मालमत्तेच्या भूप्रदेशाच्या देखभालीसाठी करण्यात येते. तसेच पावसाचे पाणी शोषून घेणारे खड्डे भूजल स्रोताचे पुनर्भरण करण्यास मदत करतात व मालमत्तेच्या सभोवताल स्वच्छता राखण्यास मदत होते.

अतिथी खोल्या म्हणजे गेस्ट रूममधील शाश्वतताः खोल्यांमधील जैव विघटनशील अतिथी सुविधांपासून, मोठ्या स्वरुपातील प्रसाधनसाहित्य, हयातच्या संरक्षण कार्यक्रमापासून ते मोशन सेन्सर नियंत्रित प्रकाश आणि व्हीआरव्ही युनिट्सपर्यंत- आमचे अतिथी सुट्टीवर असताना जाणीवपूर्वक निवड करत राहतील याची सुनिश्चितता आम्ही बाळगतो. त्यांची उत्पादने अनुक्रमे जैव-विघटनशील पॅकेजिंगमध्ये पॅक करणाऱ्या टी ट्रंक आणि हर्मिट कॉफीसारख्या स्थानिक प्रिय ब्रँडशी भागीदारी करून, आमचा प्रयत्न केवळ स्थानिक व्यवसायांनाच पाठिंबा देण्याचा नसून शाश्वततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा आहे.

अन्न आणि पेयपदार्थांमधील शाश्वतताः आमची अनोखी फार्महाऊस ब्रेकफास्टची संकल्पना आम्हाला अन्नाची नासाडी कमी करण्यास मदत करते, तर पाहुण्यांना त्यांच्या आवडीनुसार ताजे पदार्थ ताटात वाढल्याने त्यांना हंगामी आणि स्थानिक प्रेरित पदार्थांचा आनंद घेता येतो. पर्यावरणपूरक ऊसाचे पल्प पॅकेजिंग, अद्ययावत कागदी पिशव्या, जैव-विघटनशील पेंढ्या, लाकडी स्टिरर्स आणि नारळाच्या पेंढ्या ही सध्याची काही उदाहरणे आहेत. प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा वापर कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या सर्व डायनिंग ठिकाणी – रोनिल बिस्त्रो, पात्राँव आणि द हब येथे आरओ पाणी उपलब्ध करून दिले आहे. तसेच, आम्ही आमच्या येथील निवास ठिकाणी- रोनिल स्टुडिओ, द लॉफ्ट आणि स्टे फिट बाय हयात व्यायामशाळेत वॉटर डिस्पेनसर बसवले आहेत.

अधिक शाश्वत पद्धतीः सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्या निरोगी तसेच चांगले जीवन जगू शकतील हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही साइटवर इलेक्ट्रिक वेहिकल चार्जर स्थापित केले आहेत. तसेच आमच्या सुव्हिनिअर शॉप’मध्ये आम्ही स्थानिक ब्रँड आणि संस्थांना पाठिंबा देतो आणि त्याद्वारे स्थानिक कारागीर समुदायांमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो.

रोनिल गोवा- JdV बाय हयातचा भाग उत्तर गोव्यातील प्रतिष्ठित कलंगुट बागा रस्त्यावर आहे. वर्ल्ड ऑफ हयात अंतर्गत नवीन अवतारात, हे बुटीक रिसॉर्ट या गजबजलेल्या पट्ट्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल असून प्रमुख पर्यटन आकर्षणे तसेच उच्च दर्जाच्या खरेदी आणि करमणुकीच्या क्षेत्रांशी चांगले जोडलेले आहे. खासगी बाल्कनीसह येथील 135 खोल्या आणि जीवनाचा आनंद साजरा करण्यासाठी अगणित कारणे असलेले हे गोव्याचे सर्वोत्कृष्ट सुशेगाद डेस्टीनेशन

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें