सिमेन्स लिमिटेड ने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कॅपेक्स

.

सिमेन्स लिमिटेड ने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कॅपेक्स ची घोषणा केली

गोव्यातील विस्तारामुळे अत्याधुनिक गॅस इन्सुलेटेड स्विचगिअर आणि क्लीन एअर जीआयएस (ब्लू जीआयएस) तंत्रज्ञान बाजारात येणार आहे
जागतिक स्तरावर वाढत्या मेट्रो रेल्वे नेटवर्कची मागणी पूर्ण करण्यासाठी औरंगाबादेत अत्याधुनिक मेट्रो ट्रेन निर्मिती सुविधा
नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीने कळवा येथील पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि गोव्यातील व्हॅक्यूम इंटरप्टर कारखान्याची क्षमता वाढविण्याची घोषणा केली होती

सिमेन्स लिमिटेड ने आज भारतात आपल्या 32 कारखान्यांपैकी दोन कारखान्यांच्या विस्ताराची घोषणा केली. कंपनीने नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केलेल्या कळवा येथील पॉवर ट्रान्सफॉर्मर कारखाना आणि गोव्यातील व्हॅक्युम इंटरप्टर कारखान्याच्या क्षमता विस्ताराव्यतिरिक्त ही योजना आहे. यामुळे एकूण कॅपेक्स गुंतवणूक रु.1000 कोटी जास्त वाढण्याची शक्यता आहे.
मेट्रो रेल्वे निर्मिती प्रकल्प, औरंगाबाद
सस्टेनेबल शहरांसाठी सस्टेनेबल वाहतूक हा महत्त्वाचा घटक आहे. जागतिक स्तरावर वाढत्या मेट्रो रेल्वे नेटवर्कची मागणी पूर्ण करण्यासाठी सिमेन्स लिमिटेडचा मोबिलिटी बिझनेस औरंगाबाद येथे अत्याधुनिक मेट्रो ट्रेन निर्मिती सुविधा उभारण्यासाठी रु.186 कोटी गुंतवणूक करीत आहे. हे त्याच ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या बोगी उत्पादन सुविधे व्यतिरिक्त आहे. ही सुविधा अद्ययावत तंत्रज्ञान, स्थानिक पातळीवर खरेदी केलेले घटक आणि कुशल तांत्रिक मनुष्यबळाने सुसज्ज असेल आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेऊ शकेल. भविष्यात मेट्रो टर्नकी प्रकल्पांसाठी निर्यात केंद्र म्हणून ही सुविधा महत्त्वाची भूमिका बजावेल.
स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन्सचा विस्तार, गोवा
उद्योग, पायाभूत सुविधा आणि वीज वितरण क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांची झपाट्याने वाढणारी गरज भागविण्यासाठी सिमेन्स लिमिटेडचा स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस गोव्यात आपला कारखाना विस्तारत आहे. एकूण गुंतवणूक रु.333 कोटी असेल आणि गोव्यातील सिमेन्सची ही सर्वात मोठी गुंतवणूक असेल.
हा कारखाना अत्याधुनिक गॅस इन्सुलेटेड स्विचगिअर आणि क्लीन एअर जीआयएस (ब्लू जीआयएस) तंत्रज्ञान बाजारात आणणार आहे. ही उत्पादने डेटा सेंटर, मेट्रो रेल्वे, तेल आणि वायू, पोलाद, पारेषण आणि वितरण यासारख्या क्षेत्रातील ग्राहकांना त्यांच्या शाश्वततेची उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करतील.
हे दोन्ही कारखाने जागतिक स्तरावर बेंचमार्क केलेल्या सस्टेनेबिलिटी कारखान्यांमध्ये स्थान मिळवतील आणि लोकलायझेशनद्वारे भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर कार्यक्रमांमध्ये योगदान देतील. पीव्ही सोलर, मायक्रोग्रिड, ईव्ही चार्जिंग, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सह विविध सस्टेनेबल तंत्रज्ञानाचा वापर करून लीड गोल्ड मानकांनुसार, कार्बन न्यूट्रल आणि वॉटर पॉझिटिव्हनुसार कारखाने डिझाइन केले गेले आहेत आणि पुनर्वापर केलेले साहित्य आणि वर्तुळाकार बांधकाम तंत्रासह तयार केले जातील.
सिमेन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील माथूर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत भारताने उत्पादन आणि व्यवसायासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून झपाट्याने प्रगती केली आहे. आम्हाला विश्वास आहे की नवीनतम गुंतवणुकीसह, अलिकडच्या वर्षांत आमची सर्वात मोठी गुंतवणूक, आम्ही मजबूत पोर्टफोलिओ आणि गो-टू-मार्केटसह ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास सक्षम होऊ. सिमेन्सच्या भारताप्रती असलेल्या दृढ बांधिलकीचा हा आणखी एक पुरावा आहे आणि वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेच्या पूर्ण क्षमतेचा फायदा घेण्यास मदत करेल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar