स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि पवित्र अन् तेजस्वी जीवन यांना कोटी कोटी

.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि पवित्र अन् तेजस्वी जीवन यांना कोटी कोटी प्रणाम !
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म २८ मे १८८३ ) या द्रष्ट्या, क्रांतीकारी देशभक्त अन् अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे ! ‘राष्ट्र’ हेच त्यांचे जीवनमूल्य असल्याने त्यांचे एकमेवाद्वितीय साहित्य हे राष्ट्रहिताच्या अनुषंगानेच प्रसवलेले आहे. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ‘यासम हाच !’
मार्सेलिसच्या समुद्रात उडी मारून भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक व्यासपिठावर नेणारे द्रष्टे स्वा. सावरकर !
‘स्वा. सावरकरांच्या मार्सेलिसच्या सागरी साहसाने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न प्रथमच जागतिक व्यासपिठावर अतिशय आवेगाने चर्चिला गेला. भारताचे स्वातंत्र्य हा सगळ्या दुनियेचा आस्थेचा आणि चिंतेचा विषय झाला. ‘राजकीय आश्रय’ या विषयाची सखोल चर्चा झाली. ‘फ्रान्सच्या भूमीवर अवैध मार्गाने झालेली अटक हा ब्रिटिशांकडून स्वा. सावरकरांवर झालेला घोर अन्याय आहे’, असे मत मार्क्सचा नातू लोंगे याने मांडले आणि ते युरोपमधील प्रसारमाध्यमांनी उचलून धरले. स्वा. सावरकरांना ब्रिटनने फ्रान्सकडे सुपूर्द करावे या मागणीने जोर धरला आणि तो प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावा लागला. स्वा. सावरकरांवर अन्याय झाल्याचे न्यायालयाला मान्य करावे लागले. फ्रान्सच्या पंतप्रधानाला त्यागपत्र द्यावे लागले !’राष्ट्राचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता असली पाहिजे !
१९३८ साली मुंबईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून साहित्यिक सावरकरांनी हिंदूंना एक संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात स्वा. सावरकर म्हणाले, ‘‘आता सरते शेवटी मला हे सांगितल्यावाचून गत्यंतरच दिसत नाही. ‘साहित्य हे आजच्या आपल्या राष्ट्राच्या परिस्थितीत दुय्यम-तिय्यम कर्तव्य आहे. साहित्यिक सज्जनहो, सूज्ञहो, साहित्यासाठी जीवन आहे कि जीवनासाठी साहित्य ? आपले साहित्य हे राष्ट्रीय जीवनाचे एक उपांगच काय ते असेल, तर राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता, मुख्य साध्य असले पाहिजे. अगदी कलेसाठी कलेचा जो उपासक त्याच्याविषयीही मला आदरच वाटेल; पण असे उपासक त्या कलानंदात एखाद्या नाट्यगृहामध्ये रंगून गेले असता, जर त्या नाट्यगृहालाच आग लागली, तर कलेसाठी कलेला झिडकारून ते प्रथम जीव वाचवण्याच्या मार्गास लागतील. त्याचप्रमाणे राष्ट्रऱच्या प्राणावरच बेतले असता केवळ साहित्याची काय कथा ?’

लेखण्या मोडा, बंदुका उचला !
त्याप्रमाणे तुम्हीही लेखणी मोडून टाकावी नि बंदूक उचलावी. पुढील दहा वर्षांत सुनिते रचणारा एकही तरुण नाही निघाला तरी चालेल, साहित्य संमेलने नाही झाली, तरी चालतील; पण दहा-दहा सहस्र सैनिकांच्या वीरचमू आपल्या खांद्यांवर नव्यातील नव्या बंदुका टाकून राष्ट्राच्या मार्गा-मार्गांतून, शिबिरा-शिबिरांतून टप टप करीत संचलन करतांना दिसल्या पाहिजेत !

संकलक : डॉ. मनोज सोळंकी, राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar