टायगर गृपचे पै. जालिंदर भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हापसा पर्रा येथे टायगर गृप गोवा अध्यक्ष भुषण

.
वाताहार
टायगर गृपचे पै. जालिंदर भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हापसा पर्रा येथे टायगर गृप गोवा अध्यक्ष भुषण कुडाळकर यांच्या हस्ते मदर तेरेसा अनाथाश्रम तील शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय स्टेशनरी व मिठाई वाटण्यात आली.
यावेळी सिस्टर वितोरिया, सिस्टर विजया आणि सर्व मुलांनी पै. जालिंदर भाऊ जाधव यांना दिर्घ आयुष्य बद्दल आणि समाज सेवेसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली.
यावेळी लखनौ चे प्रसिद्ध डॉ. देवेश श्रीवास्तव यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखवली व व्यायाम करून घेतले.
यावेळी टायगर गोवा राज्य अध्यक्ष भुषण कुडाळकर यांनी सचिन भैया पवार, उपाध्यक्ष टायगर गृप धाराशिव जिल्ह्यातून गोवात येऊन पै. जालिंदर भाऊ जाधव, तानाजी भाऊ जाधव यांच्या कृपेने अध्यक्ष केल्या बदल कृतज्ञता व्यक्त केली. टायगर गृप ने समाज सेवेची धुरा आपल्या कडे सुपूर्द केली त्याचा आदर राखून टायगर गृप चे ध्येय आणि उदिष्टे पाळण्याचा प्रयत्न करीन असे पूढे बोलताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर सिस्टर वितोरिया, सिस्टर विजया, डॉ. देवेश श्रीवास्तव, उपाध्यक्ष केदार कुडाळकर, कार्याध्यक्ष रामरी चव्हाण, सुरज सुतार, दिप्ती कुडाळकर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धृव कुडाळकर यांनी केले तर केदार कुडाळकर यांनी आभार मानले.
फोटो भारत बेतकेकर
पर्रा येथील अनाथाश्रम तील मुलांना शेक्षणिक साहित्य वाटप करताना भुषण कुडाळकर बाजूला केदार कुडाळकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar