योगविद्येत मानवजातीचे कल्याण करण्याची शक्ती : निवृत्त कस्टम अधीक्षक भानुदास भेस्त्री

.

योगविद्येत मानवजातीचे कल्याण करण्याची शक्ती : निवृत्त कस्टम अधीक्षक भानुदास भेस्त्री

मलहर
योग हीच जीवन विद्या असून त्यात प्रत्येकाचे जीवन आनंदमयी होण्याची क्षमता आहे. आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योग विद्याच आम्हाला तारू शकेल. मानवजातीचे कल्याण करण्याची शक्ती या विद्येत आहे. म्हणून योग ही भारताची संपूर्ण विश्वाला मिळालेली देणगी आहे याचा आपण सर्वाना अभिमान असला पाहिजे असे उदगार गोवा सरकारच्या कस्टम खात्याचे निवृत्त अधीक्षक भानुदास भेस्त्री यांनी केरी पेडणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्यू इंग्लिश हायस्कुल सभागृहात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना काढले.

यावेळी सन्मानीय पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक व पत्रकार भारत बेतकेकर, मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, सर्वेश कोरगावकर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांनी योग दिनाचे महत्व विषद केले. सर्वेश कोरगावकर यांनी सामूहिक सूर्यनमस्कारांचे समंत्र प्रात्यक्षिक घेतले. त्यानंतर योग शिक्षक भानुदास भेस्त्री आणि भारत बेतकेकर यांनी विद्यार्थ्यांना प्राणायम व विविध योगासने शिकवली. तसेच योग संस्कृतीशी सुसंगत प्रश्नमंजुषा घेतली. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योग आसनांचे परीक्षण भेस्त्री व बेतकेकर यांनी केले.

शेवटी शालेय मुलांनी रोमहर्षक योग नृत्य सादर केले. विद्यार्थी मंडळाचें क्रीडा मंत्री सोहम हेमंत तळकर यांनी आभार मानले.

फोटो
केरी पेडणे येथे योग दिनानिमित्त मार्गदर्शन करताना निवृत्त कस्टम अधीक्षक व योग गुरु भानुदास भेस्त्री, सोबत भारत बेतकेकर.

दुसऱ्या छायाचित्रात मनमोहक योग नृत्य सादर करताना न्यू इंग्लिश हायस्कुलची मुले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें