वक्फ बोर्डप्रमाणे हिंदु मंदिरांसाठी सर्वाधिकार देणारे ‘मंदिर बोर्ड’ स्थापन करा ! – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वाेच्च न्यायालय

.
वक्फ बोर्डप्रमाणे हिंदु मंदिरांसाठी सर्वाधिकार देणारे ‘मंदिर बोर्ड’ स्थापन करा ! – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वाेच्च न्यायालय

       ज्या प्रमाणे मुसलमानांच्या धार्मिक मालमत्ताभूमी संरक्षित करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड स्थापन करून त्याला विशेष कायदेशीर अधिकार दिले आहेतत्याचधर्तीवर देशभरातील हिंदूंची लाखो मंदिरेत्याची भूमी आणि संपत्ती संरक्षित करण्यासाठी वक्फ बोर्डप्रमाणे मंदिरांसाठी सर्वाधिकार असलेला ‘हिंदू मंदिर बोर्ड’ स्थापन करण्यात यावातसेच केवळ हिंदूंची मंदिरे अधिग्रहण करणारा वर्ष १९५१ चा ‘रिलिजीयस इंडोवमेंट ॲक्ट’ रद्द करण्यात यावा आणि हिंदूंची सरकारीकरण झालेली देशभरातील सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून तात्काळ मुक्त करून ती भक्तांच्या नियंत्रणात देण्यात यावीअशी मागणी ‘काशी येथील ज्ञानवापीमथुरा येथील श्रीकृष्णभूमी’ आदी प्रमुख हिंदू मंदिरांचा खटला लढवणारे ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ते तथा सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ‘मंदिर संस्कृती परिषदे’तील पत्रकार परिषदेत केली.

      ते फोंडागोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने श्री विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होतेया वेळी मंदिरांच्या आर्थिक व्यस्थापनाचे अभ्यासक तथा मुंबई येथील ‘समस्त महाजन संघा’चे अध्यक्ष श्रीगिरीश शहा, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्रीसुनील घनवट, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे राज्य सचिव श्रीजयेश थळी आणि उत्तर प्रदेशातील ‘पवन चिंतन धारा आश्रमा’चे पूजनीय पवन सिन्हा गुरुजी हे उपस्थित होते.

      या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे श्रीसुनील घनवट म्हणाले कीया हिंदू अधिवेशनाच्या माध्यमांतून ‘मंदिर संस्कृती रक्षा अभियाना’ची सुरूवात झाली होतीयात आता देशभरातील सुमारे १४ हजार मंदिरांचे संघटन झाले आहेया अधिवेशनात देशभरातील २७५ हून अधिक मंदिरांचे विश्वस्तपुजारी सहभागी झाले आहेततसेच देशभरामध्ये ७१० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहेहे अभियान आणखीन व्यापक करून मंदिरातील वस्त्रसंहितेसह आम्ही देशभर ‘मंदिरे मद्यमांस मुक्त’ अभियान राबवणार आहोतमहाराष्ट्रातील श्री शनिशिंगणापूर मंदिराची १९ एकरबीड येथील श्री कंकालेश्वर मंदिराची १२.५ एकरतामिळनाडूतील तिरुचिरापल्ली गावातील १५०० वर्षांपूर्वीच्या श्रीचंद्रशेखर स्वामी मंदिरासह सुमारे १२०० एकर भूमीवर वक्फ बोर्डाने दावा लावला आहेअशा प्रकारे अनेक ठिकाणी मंदिराची भूमी वक्फने बळकावण्याचा सपाटा लावला आहेज्या मंदिरांच्या भूमी वक्फ बोर्डाने बळकावली आहेती भूमी पुन्हा त्या मंदिरांकडे तात्काळ हस्तांतरीत करण्याचे आदेश सरकारने काढले पाहिजेत.

      तसेच महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ‘वक्फ बोर्डा’च्या अंतर्गत येणार्‍या भूमीसाठीचा असणारा जुना भाडेकरार रद्द करून नवा ‘मॉडेल रेंट’ लागू केला आहेत्यामुळे आज वक्फला भाड्यापोटी दर महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहेत्याचप्रमाणे देशभरात ज्या ज्या मंदिरांच्या भूमीचा वापर सरकारी आणि खाजगी कामासाठी होत असेलतेथेही ‘मॉडेल रेंट’ तात्काळ लागू करण्यात यावातसेच पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणार्‍या घारापुरी (मुंबईयेथील शिवमंदिर आणि संभाजीनगर येथील देवगिरी किल्ल्यावरील श्री भारतमाता मंदिर येथे पूजाअर्चा बंद करण्यात आलेली आहेतेथे हिंदूंच्या देवता असल्यामुळे तेथे हिंदूंना पूजाअर्चा करण्याची अनुमती देण्यात यावीया मागण्या मान्य न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करूअसा इशारा सरकारला देत आहोत.

      ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे राज्य सचिव श्रीजयेश थळी म्हणाले कीसरकारने जरी खुलासा केला असलातरी सरकारच्या आदेशात धार्मिक स्थळे आणि शाळा यांच्या १०० मीटरच्या परिसरात नवीन दारू दुकानांना अनुमती देण्याचा निर्णय स्पष्टपणे दिलेला आहेत्यामुळे त्याला गोमंतक मंदिर महासंघाचा विरोध आहेसरकारने म्हटले आहे कीपर्यटनाच्या दृष्टीने अपवादात्मक म्हणून जरी हा निर्णय घेतलेला असलातरी यातून धार्मिक पर्यटकांच्या भावना दुखावणारा हा निर्णय आहेउद्या आम्ही २०० टक्के सुधारित शुल्क भरून जामा मशीद किंवा जुने गोवा चर्चच्या शेजारी दारूचे दुकान चालू करण्याची मागणी केलीतर सरकार पर्यटनाच्या दृष्टीने विचार करून परवानगी देणार का याचे उत्तर सरकारने द्यायला हवेपंजाबला आज व्यसनांमुळे ‘उडता पंजाब’ म्हटले जातेतसे गोव्याला ‘उडता गोवा’ करायचे आहे का त्यामुळे सरकारने हा कायदाच रद्द करावाअशी आमची मागणी आहे.

       या वेळी ‘मंदिराच्या आर्थिक सुव्यवस्थापना’ विषयी बोलतांना अभ्यासक श्रीगिरीश शहा म्हणाले कीमंदिरांच्या एकूण आर्थिक उत्पन्नापैकी केवळ १० टक्के निधी पूजाअर्जा आणि व्यवस्थापन यांसाठी ठेवण्यात यावेतर  उर्वरित निधीचा वापर मंदिराचे संवर्धनजीर्णाेद्धारसुविधालहान मंदिरांना अर्थसाहाय्य आणि समाजाच्या दृष्टीने करणे आवश्यक आहेतसेच मंदिराचे आर्थिक व्यवस्थापनसुव्यवस्थान आणि संवर्धन यांदृष्टीने विविध मंदिरांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

    उत्तर प्रदेशातील ‘पवन चिंतन धारा आश्रमा’चे पूजनीय पवन सिन्हा गुरुजी म्हणाले कीदेशातील सरकार सेक्युलर असतांना केवळ हिंदू मंदिरांचे अधिग्रहण करणे योग्य नाहीत्यामुळे आमची मागणी आहे की सरकारने सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीतत्यासाठी आम्ही मंदिर संस्कृती परिषद घेतली आहे.

आपला विश्वासू
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क क्र.: ९९८७९ ६६६६६)
————————————————————————————————
Photo Caption – डाव्या बाजूने श्री. गिरीश शहा, श्री. सुनील घनवट, पूज्य पवन सिन्हा गुरुजी, अधिवक्ता विष्णू जैन आणि श्री. जयेश थळी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar