महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म आणि ट्रान्सयुनियन CIBIL एकत्रितरीत्या SEHER कार्यक्रम सुरू करणार

.

महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म आणि ट्रान्सयुनियन CIBIL एकत्रितरीत्या SEHER कार्यक्रम सुरू करणार


SEHER मुळे भारतातील महिला उद्योजकांमध्ये निधी आणि कर्ज मिळविणे, तसेच ते व्यवस्थापित करणे याबद्दल जागरूकता वाढेल.
भारतात ६३ दशलक्ष सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आहेत, जे सुमारे २०% महिलांच्या मालकीचे आहेत, यामुळे जवळपास २७१ दशलक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे.
एका अंदाजानुसार, महिलांच्या उद्योजकतेला गती देऊन, महिला मालक असतील, अशा ३० दशलक्षाहून अधिक नवीन उद्योगांची निर्मिती भारत करू शकतो, यात १५० ते १७० दशलक्ष अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे.
मुंबई, ५ जुलै, २०२४ : महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म (WEP) आणि TransUnion CIBIL द्वारे आज लाँच केलेला SEHER हा क्रेडिट एज्युकेशन प्रोग्राम भारतातील महिला उद्योजकांना आर्थिक साक्षरता आणि व्यावसायिक कौशल्यांसह सक्षम करेल, तसेच त्यांना आवश्यक असलेल्या आर्थिक गोष्टींची माहिती करून देत, त्यात प्रवेश करण्यास मदत करेल. परिणामी, देशाच्या अर्थव्यवस्थेत आणखी वाढ होईल आणि अधिकाधिक रोजगार निर्मिती होईल.
महिला उद्योजकता कार्यक्रम (WEP) एक सार्वजनिक-खासगी भागीदारी प्लॅटफॉर्म आहे, जो नीती आयोगांतर्गत येतो. भारतातील महिला उद्योजकांसाठी एक सक्षम इकोसिस्टम तयार करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम WEP च्या फायनान्सिंग वुमन कोलॅबोरेटिव्ह (FWC) चा एक भाग आहे, ज्याचा उद्देश महिला उद्योजकांसाठी अर्थपुरवठा वेगाने व्हावा, हा असून, अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. SEHER कार्यक्रमाचा शुभारंभ सुश्री. ॲना रॉय, मिशन डायरेक्टर, महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म (WEP) आणि मुख्य आर्थिक सल्लागार, NITI आयोग यांच्या हस्ते व श्री. जितेंद्र असाटी, संचालक (वित्तीय समावेशन), वित्तीय सेवा विभाग (DFS) अर्थमंत्रालय, श्री. सुनील मेहता, मुख्य कार्यकारी, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA); श्री. नीरज निगम, कार्यकारी संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI); सुश्री मर्सी इपाओ, संयुक्त सचिव, एमएसएमई मंत्रालय आणि श्री राजेश कुमार, ट्रान्सयुनियन CIBIL चे MD आणि CEO यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सुश्री ॲना रॉय, मिशन डायरेक्टर, WEP, आणि प्रमुख आर्थिक सल्लागार, NITI आयोग, म्हणाल्या की, “MSME विकासाच्या मुख्य अडथळ्यांपैकी एक म्हणून आर्थिक निरक्षरतेचा उल्लेख केला जातो. वास्तविक, MSME हा आपल्या देशाच्या आर्थिक वाढीसाठी जास्त महत्त्व असलेला विभाग आहे. व्यवसाय वाढीसाठी वेळेवर आणि अधिक चांगल्या प्रकारे वित्तपुरवठा मिळविण्यासाठी, उद्योजकांना त्यांच्या CIBIL रँक आणि व्यावसायिक क्रेडिट अहवालासह आर्थिक पुरवठ्याविषयी सर्व गोष्टींचे ज्ञान असायला हवे. सातत्याने मिळणाऱ्या वेगवेगळ्या माहितीचा योग्य वापर करून घेणे, यासोबतच उद्योजकता प्रोत्साहन, अर्थपुरवठ्यासाठी मदत करणे, बाजारपेठेतील संबंध, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास, मार्गदर्शन आणि नेटवर्किंग, तसेच व्यवसाय विकाससेवांमध्ये प्रवेश यांसारख्या विविध मुद्द्यांमध्ये पाठबळ देत, महिला उद्योजकांना सक्षम बनवणे हे WEP चे उद्दिष्ट आहे.”
श्री. राजेश कुमार, MD आणि CEO, TransUnion CIBIL म्हणाले, “सामाजिक-आर्थिक श्रेणी, वयोगट आणि भौगोलिक स्थानांमध्ये सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या अनोख्या उपक्रमासाठी महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केल्याचा TransUnion CIBIL ला अभिमान वाटतो. व्यवसायाची वाढ ही थेट क्रेडिट ॲक्सेस, क्रेडिट जागरूकता आणि आर्थिक साक्षरतेवर अवलंबून असते. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे आणि महिला उद्योजकांची कौशल्ये सुधारणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून शाश्वत वाढीसाठी त्या त्यांचे व्यवसाय यशस्वीपणे व्यवस्थापित करू शकतील. भारताच्या USD 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टालाही हा कार्यक्रम मदत करेल, कारण अधिकाधिक महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तसेच त्यातून फायदा मिळावा, यासाठी सक्षम केले जाईल.”
महिलांच्या मालकीच्या व्यवसायांना आणि उद्योजकतेला समर्थन आणि गती देणे
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाच्या उद्यम नोंदणी पोर्टल (URP) नुसार, भारतात ६३ दशलक्ष सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आहेत, ज्यापैकी २०.५% महिलांच्या मालकीचे आहेत आणि त्यातून सुमारे २७ दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होतो. शहरी भागाच्या (१८.४२%) तुलनेत ग्रामीण भागात महिलांच्या मालकीच्या उद्योगांचा (२२.२४%) वाटा थोडा जास्त असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. या अंदाजानुसार, महिलांच्या उद्योजकतेला गती देऊन, भारत महिलांच्या मालकीचे ३० दशलक्षाहून अधिक नवीन उद्योग निर्माण करू शकतो, ज्यामुळे १५० ते १७० दशलक्ष अधिक नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज आहे. रोजगार निर्मितीमध्ये महिलांच्या मालकीच्या व्यवसायांचे योगदान URP-नोंदणीकृत युनिट्सद्वारे १८.७३% आहे.
TransUnion CIBIL डेटा असे सांगतो की, गेल्या पाच वर्षांत (FY 2019 – FY 2024) महिलांकडून व्यवसाय कर्जाची मागणी 3.9X वाढली आहे. या कालावधीत व्यवसाय कर्ज घेतलेल्या महिला कर्जदारांच्या संख्येत १०% वाढ दिसली. मार्च २०२४ मध्ये थेट व्यवसाय कर्ज घेतलेल्या १.५ कोटी कर्जदारांपैकी ३८% महिला होत्या. याच कालावधीत (मार्च २०१९ ते मार्च २०२४) महिला कर्जदारांच्या व्यवसाय कर्जासाठी पोर्टफोलिओ शिल्लक 35% CAGR ने वाढली. ट्रान्सयुनियन CIBIL ग्राहक ब्युरोच्या डेटानुसार कृषी-व्यवसाय कर्ज, व्यावसायिक वाहन आणि व्यावसायिक उपकरणे कर्ज यांसारख्या इतर उत्पादनांमध्ये महिला कर्जदारांचा हिस्सा २८% (मार्च २०१९ ते मार्च २०२४) वर स्थिर राहिला आहे.
महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय संपूर्ण भौगोलिक क्षेत्रांमध्ये वाढत असल्याने, व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांना जलद, सुलभ आणि किफायतशीर प्रवेशासह सक्षम बनवणे याला सर्वोच्च प्राधान्य आहे. क्रेडिट एज्युकेशनवर लक्ष केंद्रित करून, SEHER महिला उद्योजकांना आर्थिक साक्षरता सामग्रीसह वैयक्तिक साधनांची माहिती देईल. देशभरातील महिला उद्योजकांना चांगला क्रेडिट इतिहास आणि CIBIL स्क%

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar