सरकारी इमारतींच्या स्थितीवर अ‍ॅड.फरेरा मांडणार

.

जुलै १२, २०२४

प्रसिद्धी पत्रक

सरकारी इमारतींच्या स्थितीवर अ‍ॅड.फरेरा मांडणार लक्षवेधी सूचना
पणजी : ढासळत्या सरकारी इमारतींचा मुद्दा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडणार असल्याचे हळदोण्याचे आमदार अ‍ॅड कार्लोस आल्वारेस फरेरा यांनी शुक्रवारी सांगितले.
पर्वरीतील गृहनिर्माण मंडळाच्या व्यावसायिक वजा निवासी इमारतीत असलेल्या जिल्हा (उत्तर गोवा) ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या आवाराला भेट दिल्यानंतर अ‍ॅड फरेरा म्हणाले की, इमारतीची अवस्था आणि त्यामुळे तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना असलेला धोका पाहून मला धक्का बसला आहे.
प्लास्टरचे तुकडे पडत असून खिडक्या तुटत असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यामुळे मी भेट दिली. कार्यालयात येणार्‍या लोकांवा धोका निर्माण झाला आहे. सरकारी इमारती असुरक्षित होत आहेत, हा मुद्दा मी नेहमीच उचलून धरला आहे. या इमारतींची डागडुगी काम करण्यासाठी कुणाच्या मृत्यूची वाट पाहण्यात येत आहे का? असा सवालही अ‍ॅड. फरेरा यांनी विचारला आहे.
’२०१८ साली प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मी अभियंत्याशी बोललो आहे आणि त्याने आतापर्यंत काय केले हे सादर करण्यासाठी मी उद्या त्याला बोलावले आहे. तो काय करू इच्छितो हे मला जाणून घ्यायचे नाही. केवळ उत्तर गोवा संबंधितच नाही तर प्रत्येक मंच, अगदी न्यायालयेही अशी ठिकाणे असावीत जिथे लोक न घाबरता येऊ शकतील, याची मी काळजी घेईन, असे अ‍ॅड फरेरा यांनी सांगितले.
200, 300 वर्षे जुनी गोव्याची घरे कशी टिकून आहेत आणि त्यांचे काहीच झाले नाही, पण येथे सरकारी इमारती दहा वर्षेही टिकत नाहीत, याकडे अ‍ॅड. फरेरा यांनी लक्ष वेधले.
इमारतीच्या टप्प्यावर तडजोड केली जात आहे किंवा दुरुस्तीचे काम केले जात नाही. शाळाही कोसळत असून मुलांसाठी असुरक्षित आहेत. टोंका येथील पशुवैद्यकीय सेवा इमारतीचे छत असुरक्षित आहे. इमारतीचे तुकडे पडत आहेत आणि इमारत असुरक्षित आहे.
सरकारने कारवाई न केल्यास त्यांना धारेवर धरले पाहिजे. हा सरकारचा गैरकारभार आहे. केवळ मोठा पूल बांधला म्हणून समस्या सुटत नाही. देखभालीचा विचार करावा देखील करावा लागेल, असेही ते म्हणाले.
मी सभागृहात लक्षवेधी मुद्दा मांडणार आहे. केवळ ही इमारतच नाही, तर ज्या शाळांची दुरवस्था झाली आहे आणि तिथे काम करणार्‍यांना धोका आहे, अशा शाळांसह सर्व इमारतींबद्दल मी बोलणार आहे.
आयोगावर सर्व जबाबदारी टाकणे योग्य नाही, त्यांना स्वत:चे काम करायचे आहे. ही इमारत गृहनिर्माण मंडळाची आहे. या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सोसायटीची आहे. देखभाल करणे हे सोसायटीचे कर्तव्य आहे. त्यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांनी गृहनिर्माण मंडळाकडे विनंती करावी, असे फरेरा म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें