केरी शाळेत भविष्याचा वेध घेणारी स्टेम रोबोटिक्स कार्यशाळा

.

केरी शाळेत भविष्याचा वेध घेणारी स्टेम रोबोटिक्स कार्यशाळा
० अमेरिकेच्या जी.आय.आरचे मार्गदर्शन
० शाळेतील मुलींच्या रोबोटिक्स क्लबला लेगो रोबोट भेट.
० भविष्यात ग्रामीण मुलांसाठी सातत्याने मार्गदर्शन

हरमल दि
अमेरिकास्थित गर्ल्स फॉर रोबोटिक्स (जी.आय.आर) या अमेरिकन बिगर शासकीय संस्थेतर्फे केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये दोन दिवसीय स्टेम रोबोटिक्स कार्यशाळा घेण्यात आली.

अमेरिकेच्या हायस्कुलस्थरीय रोबोटिक्स संघात अव्वल स्थान प्राप्त जी.आय.आर. रॉबोटिक्स संघाच्या कर्णधार तथा तिथल्या शाळेतील रोबोटिक्स क्लबच्या संचालिका निधी मांद्रेकर, फिलिप्स कंपनीचे उत्तर अमेरिकेचे माजी प्रमुख माहिती अधिकारी वं जी आय आरचे प्रशिक्षक दीपक मांद्रेकर आणि डॉ पल्लवी मांद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्टेम रोबोटिक्स कार्यशाळा पार पडली.

शाळेतील निवडक ३३ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतलेला. रोबोट निर्मितीसाठी लागणारे जावा प्रोग्रॅमिंग, रोबोटचे डिझाइनिंग व नियोजन करून रोबोट कसे तयार करावे याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले.

दुसऱ्या दिवशी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटचे सर्व मुलासमोर प्रार्यक्षिक करून दाखविले. . यावेळी मुलांनी रोबोट प्रत्यक्ष हाताळले, तसेच आपल्या शंकानाचे निरसन करून घेतले.

ग्रामीण भारतातील मुलांमध्ये नैसर्गिता कुशग्र बुद्धिमत्ता असते. म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स सारखे अध्ययावत ज्ञान मिळाले तर ती भविष्यात या क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतील. याच उद्देशाने जी आय आर, अमेरिकाने केरी सारख्या गावात ही कार्यशाळा भरवली असल्याचे यावेळी दीपक मांद्रेकर यांनी सांगितले.

रोबोटिक्सला आगामी काळात मोठी मागणी आहे. आर्टिफिशल इंटिलिजन्समुळे भविष्यात सर्वच क्षेत्रात मोठी आव्हाने निर्माण होणार आहेत. माणसाला पर्याय म्हणून रोबोट्स कार्यरत होतील. तेव्हा भविष्याचे वेध घेत केरीतील ग्रामीण शाळेत रोबोटिक्सवर कार्यशाळा घेण्यामागचा हेतू असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी व्यक्त केला.

मुलींना मुलांसोबत विज्ञान तंत्रज्ञानाच्या समान संध्या उपलब्ध व्हाव्या यासाठी जी. आय. आरने शाळेच्या मुलींचा रोबोटक्स क्लब स्थापन करण्यासाठी आवाहन केले. तसेच त्यांना सातत्याने मार्गदर्शन दिले जाईल असे सांगितले. याचाच भाग म्हणून निधी मांद्रेकर यांनी शाळेला जी आय आर लेगो रोबोटिक्स किट भेट दिले. ज्याचा लाभ मुलांना रोबोटिक्स अध्ययन व स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी होईल.

त्यानंतर केरी शिक्षण संस्थेचे खजिनदार मिलिंद तळकर यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

समारोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सौरभ पेडणेकर यांनी केले. संगणक शिक्षिका स्मिता मांद्रेकर यांनी आभार मानले.

फोटो
१. केरी पेडणे येथे न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये स्टेम रोबोटिक्स कर्यशाळेत मार्गदर्शन करताना जी आय आर अमेरिका संघाच्या निधी मांद्रेकर, सोबत प्रशिक्षक दीपक मांद्रेकर, मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, मिलिंद तळकर, स्मिता मांद्रेकर.
२. रोबोटिक्सची प्रात्यक्षिके दाखवताना मुले.
३. शाळेच्या रोबोटिक्स क्लबला लेगो रोबोट किट भेट देताना निधी मांद्रेकर.
४. रोबोटिक्समधील संधीविषयी मार्गदर्शन करताना दीपक मांद्रेकर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar