श्री दामोदर सप्ताहाला सरकारने आर्थिक मदत करावी, असे मत आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवा प्रदेश अध्यक्ष नितीन

.

पणजी प्रतिनिधी
श्री दामोदर सप्ताहाला सरकारने आर्थिक मदत करावी, असे मत आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवा प्रदेश अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी प्रसिध्दी पत्रकात केले आहे.

श्री दामोदर सप्ताह यंदा १२५ वर्षे साजरी करत आहे. या अनुषंगाने गोव्यातील व गोव्याबाहेरील अनेक भक्तगण या दामोदर सप्ताहाला मोठ्या संख्येने येणार असून यंदाचा सप्ताह मोठ्या थाटात साजरा होणार आहे. वास्कोच्या सप्ताहाला सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. अशा उत्सवाला राजाश्रय मिळयला हवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिक आमदार यांनी या विषयात लक्ष घालून यंदाच्या वर्षी भरीव आर्थिक सहाय्यक या दामोदर सप्ताह साठी घेण्याची गरज असून या साठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे फळदेसाई म्हणाले.

एका बाजूने सरकार फ्रान्सिस झेवीयरच्या फेस्ता साठी तीनशे कोटी खर्च करणार आहेत. खरं तर फ्रान्सिस झेवीयरचा गोव्याशी काडीचाही संबंध नाही, तरीही सरकार या सगळ्या कार्यक्रमासाठी उधळपट्टी करणार आहे. त्याऐवजी देव दामोदर हे संपुर्ण गोमंतकीय जनतेचे श्रध्दास्थान आहे. या श्रद्धेचा मान राखत सरकारने या मागणीवर विचार करावा.

आपले सरकार विविध उपक्रमांना आर्थिक सहकार्य करत असते, मात्र दामोदर सप्ताह कार्यक्रमात जाणिवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे. सरकारने लोकभावनेचा आदर करावा, व भरीव आर्थिक सहकार्य करावे, तसेच दरवर्षी साठी तरतुदही करावी, अशी मागणी फळदेसाई यांनी केली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar