कोकणी लेखक संघाचा वर्धापन दिन सोहळा नुकताच अकादमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ तियात्रिस्त, समाजसेवक आणि साहित्यिक प्रेमानंद लोटलीकर, सम्मानानीय अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यिका आणि निवृत्त शिक्षिका विजया शेल्डेकर, खास निमंत्रित कार्यवाहू अध्यक्ष, गोवा कोकणी अकादमी वसंत सावंत, कोकणी लेखक संघाचे अध्यक्ष गौरीश वेर्णेकर, सचिव अनघा कामत, खजिनदार मिलिंद भरणे उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ साहित्यिक श्रीकांत शंभू नागवेकर, जेष्ठ साहित्यिका सुधा खरंगटे, जेष्ठ स्तंभलेखक अरविंद काकोडकर आणि साहित्यिका उषा राणे यांचा संघातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी आमंत्रित कोंकणी कवींचे हास्यकवी संमेलन आणि मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
फोटो कॅप्शन: साहित्यिक डॉ. गुरुदास नाटेकर यांचा बहुमान करताना साहित्यिक प्रेमानंद लोटलीकर, बाजूला विजया शेल्डेकर, कोकणी लेखक संघाचे अध्यक्ष गौरीश वेर्णेकर, सचिव अनघा कामत,