पणजी पीपल्स विद्यालयात करिअर मार्गदर्शन सत्र

.

पणजी पीपल्स विद्यालयात करिअर मार्गदर्शन सत्र

दहावी -बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची तसेच नोकरी व व्यवसायांची माहिती योग्य वयात विद्यार्थ्यांना मिळावी अन् त्यांच्या भवितव्याचा मार्ग सुकर व्हावा या उद्देश्याने मळा-पणजी येथील पीपल्स विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अश्विनी बेलगामकर यांनी पीपल्स विद्यालयाच्या विद्यार्थी तसेच पालकांना उदबोधक मार्गदर्शन केले.
दहावी -बारावीची मुले या वयात आपल्या भवितव्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी जनसंपर्कात राहून आवश्यक ती माहिती मिळवली पाहिजे, विविध स्रोत मिळवले पाहिजेत, असे डॉ.अश्विनी बेलगामकर म्हणाल्या. नऊ व दहा ऑगस्ट रोजी आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही विविध करिअरविषयी माहिती देण्यात आली.
दरम्यान, विद्यार्थीवर्गाचे हित लक्षात घेऊन पीपल्स एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे प्रतिवर्षी विविध प्रयोगशील उपक्रम राबविले जातात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar