- श्री शांता विद्यालयामध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
श्री शांता विद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाच्या मुख्याद्यापिका सौ. प्रजीता सांगाळे, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने करण्यात आली.त्यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रजीता सांगाळे आणि फॅशन डिझानर विषयाच्या शिक्षिका सौ. अंजली कदम यांनी डॉ .एस .आर .रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.
देशात ग्रंथालयाची चळवळ सुरु करणारे डॉ. एस .आर . रंगनाथन यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. राष्ट्रीय ग्रंथपाल दिवसाचे महत्व सांगताना सहावीची विद्यार्थीनी कु.शर्वाणी पेडणेकर हिने ‘आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ . रंगनाथन यांचा मोलाचा वाटा’ असल्याचे म्हटले.
श्री शांता विद्यालयामध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा श्री शांता विद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन
.
[ays_slider id=1]