नवा भारत घडवण्यासाठी कार्बगार नागरिकांची आवश्यकता : व्रजेश केरकर

.

नवा भारत घडवण्यासाठी कार्बगार नागरिकांची आवश्यकता
: व्रजेश केरकर

केरीत दिमाखात स्वातंत्र्यदिन साजरा

राष्ट्रीय नेत्यांची वेशभूषा परिधान करून आगळा वेगळा फॅशन शो आकर्षण

हरमल :
अनेक स्वातंत्र्यवीरांच्या त्याग आणि बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. मिळालेले स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून भारतीय सशस्त्र सेनांचे जवान देशाच्या सीमांवर तैनात आहेत. सुरक्षित सीमामुळेच देशवासी प्रगतीची करीत आहेत. लोकशाहीची मुल्ये बळकट करण्यासाठी आज स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या कर्तबगारीने देशाची सेवा करत देशाला योग्य दिशा प्राप्त करून दिली तरच आपला नवा प्रगतशील भारत उदयास येईल असे प्ररीपादन न्यू इंग्लिश हायस्कुल शालेय सानितीचे चेअरमन व्रजेश केरकर यांनी केले.

केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलने आयोजित केलेल्या भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून व्रजेश केरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी व्यासपीठावर केरी शिक्षण संस्थेचे खजिनदार मिलिंद तळकर, राजन सावळ, दत्ताराम नाईक, सर्वेश कोरगावकर, हयास्कुल पाळक शिक्षक संघ अध्यक्ष अमृत पेडणेकर, प्राथमिक विभाग पा. शि. संघ अध्यक्ष प्रज्योती वस्त, शालन सोसे, शिल्पा परब, राश्मिता सावळ व शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर उपस्थित होते.

यावेळी मुलांची ऐकल देशभक्ती गीत गायन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला गेला. नियती मठकर, सायना तळकर आणि यशस्वी सावळ यांची समयोचित भाषणे झाली. संगीत शिक्षक राजेश पुर्खे, स्वप्नील मोर्जे वं रोशनी गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी देशभक्तीगीत सादर केले. भारतीय स्वातंत्र्यात योगदान दिलेल्या थोर नेत्यांची वेशभूषा करून मुलांनी आगळा वेगळा देशप्रेम व्यक्त करणारा फॅशन शो सादर करून सर्वांची मने जिंकली.

प्राथमिक विभागाचे पालक प्रज्योती वस्त, शालन सोसे, राश्मिता सावळ व शिल्पा परब यांनी यावेळी ३८ राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमा शाळेला भेट दिल्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गुरुप्रसाद तांडेल यांनी केले. सौरभ पेडणेकर यांनी आभार मानले. तर सांघिक वंदेमातरमाने कार्यक्रमाची सांगाता करण्यात आली.

छाया :
१)केरी पेडणे येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत फॅशन शो सादर केलेल्या मुलांसोबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्रजेश केरकर, मिलिंद तळकर, राजन सावळ, अमृत पेडणेकर, प्रज्योती वस्त व अन्य.
२) राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमा भेट देताना शाळेचे पालक व पदाधिकारी.
३) सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करताना मुले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar