हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फोंडा येथे निदर्शनाद्वारे मागणी
महिलांवरील अत्याचार आणि ‘लव्ह जिहाद यांच्या विरोधात कायदा’ करा !
फोंडा, २९ ऑगस्ट – अल्पवयीन मुली, युवती आणि महिला यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात कठोरात कठोर दंड देण्याची कायद्यात तरतूद करणे, तसेच गोव्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करणे या मागण्या हिंदु जनजागृती समितीने फोंडा येथील क्रांती मैदानात २९ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्या निदर्शनाद्वारे केल्या.
निदर्शनाला प्रारंभी सौ. सुमेधा नाईक यांनी प्रस्तावनेत निदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला. आज महिलांची सुरक्षितता हा राष्ट्रीय स्तरावरील खूप महत्त्वाचा विषय बनला आहे. गोव्यामध्ये वर्ष २०१९ मध्ये ५१, वर्ष २०२० मध्ये ४३, वर्ष २०२१ मध्ये ४९, वर्ष २०२२ मध्ये ५५ आणि वर्ष २०२३ मध्ये ६२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले आहेत. एकंदरीत स्थिती पहाता महिला आणि मुली यांनी घराबाहेर पडावे कि नाही, असा विचार येऊन महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज गुन्हेगारांना कायद्याचे भय नाही, दंडाचे भय नाही. काही काळाने समाज या घटना विसरतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा या घटना घडतच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी आया-बहिणींवर हात टाकणार्यांचे हात आणि पाय छाटून ‘चौरंगा’ करण्याची शिक्षा दिल्यानंतर लगेचच अशा गुन्ह्यांचे प्रमाण थांबले होते. असा वचक गुन्हेगारांवर जेव्हा निर्माण होईल, तेव्हाच या घटनांवर अंकुश ठेवता येऊ शकतो. यासाठी राज्यात बलात्कार्यांना भरचौकात जाहीर फाशी देणे किंवा त्यांना नपुंसक बनवणे, त्यांचा चौरंगा करणे, अशा कठोर तरतुदींचा समावेश असणारा कायदा बनवावा. अत्याचारांच्या घटनांमध्ये दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयीन प्रक्रिया चालवावी. मुलीं-मुलांना शाळा-महाविद्यालयांमधून स्वसंरक्षण प्रशिक्षण द्यावे. यासाठी हिंदु जनजागृती समितीची ‘रणरागिणी’ शाखा शासन किंवा शाळांचे व्यवस्थापन यांना सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध आहे. ओटीटी आणि मूव्ही प्लॅटफॉर्मवर तरुणांमध्ये अश्लीलता पसरवणारे अश्लील चित्रपट आणि वेब सीरिज सहज उपलब्ध आहेत. या पॉर्न फिल्म्स आणि ओटीटी मीडियाला वेळीच आळा घालावा.
आपला विश्वासू,
डॉ. मनोज सोलंकी,
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)
आंदोलनामध्ये सहभागी संघटना : नारीशक्ती संघटना-फोंडा, इस्कॉन, भारत माता की जय, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी आणि सनातन संस्था
आंदोलनातील वक्त्यांची नावे – हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री महेश पारकर, नारीशक्ती फोंडाच्या सौ. अनिता कवळेकर, हिंदुत्वनिष्ठ प्रवीण चौधरी, हिंदुत्वनिष्ठ विनय सिंग, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक सुनील घनवट आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस