हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम पर्वरी येथील आस्थापनाने श्री गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे विज्ञापन हटवले

.
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम
पर्वरी येथील आस्थापनाने श्री गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे विज्ञापन हटवले

पणजी, ३० ऑगस्ट – ‘पिझा’चे घरपोच वितरण करणार्‍या पर्वरी येथील ‘ला पिनोझ पिझा’ या आस्थापनाने श्री गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे विडंबनात्मक विज्ञापन हटवून त्या ठिकाणी नवीन श्री गणेशाचे चांगले चित्र लावले आहे. हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनानंतर विडंबनात्मक विज्ञापन हटवण्यात आले आहे.
श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापनाच्या पर्वरी येथील दुकानाच्या प्रवेशद्वारावर श्री गणेशाचे ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे चित्र रेखाटलेले होते. या चित्रात पॅन्ट आणि शर्ट घातलेला श्री गणेश सायकलवर बसलेला दाखवण्यात आला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने आस्थापनाच्या मालकीण कु. कोमल सिंग यांची भेट घेतली. कु. कोमल सिंग यांना संबंधित विज्ञापनामुळे श्री गणेशाचे विडंबन झाल्याचे आणि यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच या वेळी हिंदु शास्त्रानुसार मूर्ती कशी असावी याविषयी माहिती त्यांना देण्यात आली. अनावधानाने हे विज्ञापन प्रसिद्ध केल्याचे कु. कोमल सिंग यांनी या वेळी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दिलीप कुंभार, अरविंद कुमार, हिंदु जनजागृती समितीचे राज बोरकर आणि सुशांत दळवी यांचा समावेश होता.

आपला नम्र,
डॉ. मनोज सोलंकी,राज्य समन्वयक, गोवा,
हिंदु जनजागृती समिती, संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें