विद्यार्थ्यांनी जिवबादादा केरकर यांचे स्थायी कार्य व कर्तुत्वाचे संशोधन करावे –

.

विद्यार्थ्यांनी जिवबादादा केरकर यांचे स्थायी कार्य व कर्तुत्वाचे संशोधन करावे –

हरमल वार्ताहर

केरी गावचे सुपुत्र बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर यांचा पराक्रमाचा इतिहास चरित्र खंडात लिखित स्वरूपात आहे.परंतु केरी गावातील त्याची निवासस्थानवास्तू तसेच बाब्र्यावरील बांध,देवस्थानास दिलेले चांदीचे अलंकार, मुर्त्या, आरोंदा येथे त्याच्या बहिणीचे घर, मोरजी गावातील वास्तव्य आदी अन्य गोष्टीचा अभ्यास व संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यानी केले.

केरी न्यू इंग्लिश स्कूल व गोवा मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षिबहद्दर जिवबादादा केरकर यांच्या चरित्राच्या पहिल्या खंडाच्या अर्पण सोहळ्यात प्रा सामंत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर दैनिक नवप्रभाचे संपादक परेश प्रभू,प्रा गजानन मांद्रेकर,सरपंच धरती नागोजी,न्यू इंग्लिश संस्थेचे चेअरमन व्रजेश केरकर,उपाध्यक्ष विठ्ठल गडेकर,मिलिंद तळकर, दत्ताराम नाईक,सूरज तळकर,बाळा फरास, बाबुसो तळकर,व्यवस्थापक शैलेंद्र कुबल,  पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अमृत पेडणेकर,उपाध्यक्ष संजना तळकर,आनंद शिरगावकर आदी उपस्थित होते.

प्रा सामंत पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यानी पराक्रमी जीवबादादांचा एक गुण जरी घेतला तरी चरित्र खंड अर्पण सोहळा सार्थकी लागेल. इतिहास हा केवळ परीक्षा व वाचण्यासाठी नसून तो जगण्यासाठी असणे आवश्यक आहे. त्या इतिहासकालीन शुरविरासारखे आपण व्हावे ही इच्छा बाळगून प्रयत्न केले पाहिजे.

ह्या चरित्र खंडाचे संपादक परेश प्रभू यांनी जिवबादादांचा अख्खा इतिहास उपस्थितांसमोर सादर केला. जिवबा हे केरी गावातून 1756 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी उत्तर भारतात जाऊन,ते शिंदेशाहीत सेनापती बनले.

संझगिरी हे त्याचे मुळ आडनाव, प्रारंभी ते मोरजीत आले व नंतर त्यातील एकजण केरीत स्थायिक झाल्याने,त्याचे आडनाव केरकर झाले.

जीवबादादा केरकर यांच्या बरोबरीने पार्से गावातील लखबादादा लाड नावाचे गृहस्थ होते.त्या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पुनर्स्थापना केली. ह्या दोन्ही पेडणेच्या विरांचे १८ व्या शतकात मराठी साम्राज्य घडवण्यात अनमोल योगदान होते. याचा आम्ही पेडणे तसेच गोमंतवासि्यांनी अभिमान बाळगला पाहिजे,असे मत परेश प्रभू यांनी आपल्या ओघवत्या शैलीत व्यक्त केले.

जिवबादादा आयुष्याची ३६ वर्षे शिंदेचे सेनापती राहिले. संपूर्ण आयुष्य शत्रूशी लढण्यात गेलें ,त्यांच्या बरोबरीने त्यांचे सख्खे बंधू ,चुलत बंधू,मुलगा नारायणराव बक्षी,तेवढेच पराक्रमी होते. जिवबादादा आपल्या कारकिर्दीत ३६० लढाया लढले पण कधी ही पराभूत झाले नाही.

जिवबादादा स्वतः एक महाप्रतापी सूर्य होते ,त्याना पराभव ठाऊक नव्हता.

अशा थोर महापराक्रमी योदध्याचा केरी गावातील नव्या पिढीने वाचन करावे व त्यांच्या समान स्वतः पराक्रमी बनण्याची इच्छा बाळगावी,असे आवाहन संपादक परेश प्रभू यांनी केले.

गेल्या महिन्यात गोवा कला अकादमीने पेडणे संत सोहिरोबनाथ महाविद्यालयात ह्या ग्रंथाचे प्रकाशन केले.मात्र अकादमीने त्याच्या केरी गावात असा कार्यक्रम आयोजित करून चांगला पायंडा घातला आहे.पहिला खंड अंदाजे चारशे पानाचा व दुसरा खंड चारशे मिळून आठशे पानात चरित्र प्रकाशित होत असल्याचे केरी वासियांना सार्थ अभिमान असणे स्वाभाविक आहे,असे प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यानी व्यक्त केले.संस्थेचे चेअरमन तथा केरकर यांचे वंशज ब्रजेश केरकर यांनी कार्यक्रम आयोजकांचे अभिनंदन केले व बक्षीबहाद्दर जीवबादादा केरकर यांचे निवासस्थान,केरी, हरमल व अन्य मंदिरांना चांदीचे अलंकार दिले,ते अद्यापही देवाच्या उत्सवात घातले जातात असे सांगितले.
तसेच प्रा अनिल सामंत , परेश प्रभू याना दुसऱ्या चरित्र खंडास आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन चेअरमन केरकर यांनी दिले.

मान्यवरांचा परिचय शिक्षक सर्वेश कोरगावकर यांनी केला,विद्यार्थीनींनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले व जीवबादादा केरकर यांच्या तसबिरीस पुष्पहार अर्पण केला.

ह्या कार्यक्रमात बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर यांचे वंशज ,हायस्कूलचे चेअरमन ब्रजेश केरकर,रोहन केरकर,देवेंद्र केरकर तसेच सरपंच धरती नागोजी,हायस्कूलचे उपाध्यक्ष मिलिंद तळकर,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अमृत पेडणेकर,सरकारी शाळा तळवाडा मुख्याध्यापिका यशश्री नाईक व मधलावाडा सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्या गाड तसेच पेडणे संत सोहिरोबनाथ महाविद्यालयाच्या विध्यार्याना चरित्र खंड प्रत भेट देण्यात आले. यावेळी चेअरमन ब्रजेश केरकर यांनी शाळेच्या वतीने प्रा अनिल सामंत व संपादक परेश प्रभू यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

सूत्रनिवेदन प्रा आनंद कोळंबकर यांनी केले तर शिक्षिका मिताली हरमलकर यांनी आभार मानले.

फोटो
केरी पेडणे येथे जिवबादादा केरकर यांच्या चरित्र ग्रंथाच्या अर्पण सोहळ्याचे उदघाटन करताना प्रा अनिल सामंत, सोबत परेश प्रभू, धरती नागोजी, व्रजेश केरकर, भावार्थ मांद्रेकर व अन्य.

२. केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्यावतीने प्रा अनिल सामंत वं परेश प्रभू यांचा सत्कार करताना व्रजेश केरकर.
3. उपस्थित स्रोते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar