जागतिक पर्यटन दिन २०२४ निमित्त पर्यटन खात्याकडून पर्यटन भागधारक आउटरीच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन*

.

*जागतिक पर्यटन दिन २०२४ निमित्त पर्यटन खात्याकडून पर्यटन भागधारक आउटरीच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन*

*पणजी, २५ सप्टेंबर २०२४* – जागतिक पर्यटन दिन २०२४ निमित्त, गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने मिरामार येथे विवांता गोवामध्ये, पर्यटन भागधारकांसाठी आउटरीच कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले. या कार्यक्रमाला पर्यटन क्षेत्रातील विविध प्रमुख भागधारकांची उपस्थिती लाभली, ज्यांनी गोव्याच्या पर्यटन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व महत्वाचे योगदान दिले आहे.

या कार्यक्रमाचे नेतृत्व करत माननीय पर्यटन मंत्री, श्री. रोहन ए. खंवटे आणि पर्यटन संचालक, श्री. सुनील अंचिपाका, आयएएस यांनी भागधारकांमधील संवाद आणि सहयोग वाढवण्यावर भर दिला. पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी जसे की वॉटरस्पोर्ट्स (जलक्रीडा), बीच शॅक्स, वॉटरपार्क, वेलनेस पर्यटन, रेस्टॉरंट संघटना आणि अन्य भागधारक, माहिती व अनुभव सामायिक करण्यासाठी तसेच गोव्यातील पर्यटन विकासाच्या विविध मार्गांवर चर्चा करण्यासाठी यावेळी उपस्थित होते.

पर्यटन भागधारकांच्या आउटरीच कार्यक्रमा दरम्यान, पाच प्रमुख भागधारकांनी गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या विविध पैलूंवर, त्यांनी आत्मसाद केलेले कौशल्य सामायिक केले. ऊर्जा वेलनेस सेंटरच्या सौ. ऋचा सरतारकर यांनी गोव्यातील निरोगी आणि वैद्यकीय पर्यटनाच्या वाढत्या संभाव्यतेवर भाष्य केले. गोवा ॲक्वा वर्ल्ड सांखळीचे भागीदार, श्री. रामापती पित्रे यांनी पर्यटन क्षेत्रातील घडामोडींवर विचार व्यक्त केले. कळंगुटच्या वॉटर स्पोर्ट्स सांघटनेचे प्रतिनिधीत्व करत श्री. पॉल सिल्व्हेरा यांनी गोव्यातील वॉटरस्पोर्ट्सच्या विस्तार आणि भविष्याविषयी माहिती दिली. शॅक ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष, श्री. क्रुझ कार्दोझो यांनी नवीन शॅक धोरण आणि समुद्रकिनारी पर्यटनावर त्याचा परिणाम, यावर चर्चा केली. शेवटी, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन आणि स्मॉल रेस्टॉरंट्स असोसिएशनचे, श्री. राजेश साळगावकर यांनी आदरातिथ्य उद्योग आणि गोव्याच्या पर्यटन विस्तारामध्ये त्यांची भूमिका, याविषयी आपला दृष्टिकोन व्यक्त केला. या चर्चांनी गोव्याच्या शाश्वत आणि पुनरुत्पादित पर्यटन उद्दिष्टांसोबत, पर्यटन वाढीचे संरेखन करण्यासाठी व्यापक अश्या संभाषणात योगदान दिले.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यटन संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. अंचिपाका यांनी गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात सहयोग आणि नावीन्यपूर्णतेच्या गरजेवर भर देऊन, दिवसभराच्या कार्यवाहीसाठी एक वेग तयार केला. त्यांनी शाश्वत आणि पुनरुत्पादित पर्यटनाला चालना देण्यासाठी खात्याकडून सुरूअसलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आणि उदयोन्मुख पर्यटन उपक्रमांसाठी सरकारच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील योगदानाबद्दल, विविध संघटना आणि भागधारकांना कौतुकाचे प्रतीक म्हणून स्मृतिचन्ह प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात माननीय पर्यटन मंत्री श्री. रोहन ए. खंवटे आणि पर्यटन संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस तसेच भागधारक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत केक कापण्याचा समारंभही झाला.

श्री. रामापती पित्रे यांनी इको-फार्म उपक्रम आणि वॉटरपार्क सुविधांच्या संभाव्यतेवर चर्चा केली. विशेषतः उत्तर गोव्यात, पर्यटकांचा ओघ वाढवण्यासाठी एक समर्पित असे पर्यटन सर्किट तयार करण्याच्या कल्पनेवर त्यांनी जोर दिला. पेले फ्रान्सिस आणि इतर भागधारकांसह, त्यांनी गोव्याच्या पर्यटन उपक्रमांच्या यशाबद्दल आपले विचार सामायिक केले. सरकारचे मजबूत समर्थन आणि राज्याचे पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी सहयोगी प्रयत्नांचा होणारा महत्त्वपूर्ण परिणाम त्यांनी अधोरेखित केला. उपस्थित सर्व वक्त्यांनी सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या भूमिकेची कबुली देत, ​​उद्योगाला पर्यटन मंत्र्यांकडून मिळत असलेल्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पर्यटन भागधारकांच्या आउटरीच कार्यक्रमाने क्षेत्र-विशिष्ट गरजा आणि संधींना संबोधित करण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम, गोव्याची पर्यटन वाढ पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशी दोन्हीही होते, याची खात्री करून शाश्वत आणि पुनरुत्पादित पर्यटनाला चालना देण्यासाठी, मंत्री खंवटे यांच्या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. राज्याचे निसर्गसौंदर्य आणि अद्वितीय वारसा यांचा समतोल राखून गोव्याचे पर्यटन कसे वाढवायचे यावर चर्चा झाली. शिवाय, सरकारने नवनवीन आणि नाविन्यपूर्ण अश्या पर्यटन उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली, जे दोलायमान व दूरगामी उद्योगाला हातभार लावतील.

कार्यक्रमात बोलताना माननीय पर्यटन मंत्री, श्री. रोहन ए. खंवटे यांनी सहकार्यात्मक प्रयत्नांचे महत्त्व आणि पर्यटन क्षेत्रातील नवीन संकल्पना सादर करण्यावर भर देताना सांगितले की, “तुम्हाला पाठिंबा देऊन, आवश्यक असलेली कोणतीही मदत पुरविण्यासाठी आम्ही तयार आहोत. पुनरुत्पादित पर्यटनाप्रती आमच्या वचनबद्धतेसह, आम्ही पर्यटन सेवा सर्वसमावेशक असल्याची खात्री करून सर्वांसाठी संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने समाज, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या तीन महत्त्वाच्या अनुलंबांवर काम करत आहोत. आम्ही ‘होमस्टे’च्या माध्यमातून महिला उद्योजकांचे सक्षमीकरण करत आहोत. तसेच पर्यटकांना आकर्षक आणि अस्सल गोवा अनुभवता यावा, यासाठी ग्रामीण पर्यटनाचे जतन आणि प्रचार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. याव्यतिरिक्त, आम्ही आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी तयार केलेल्या नवीन पॅकेजसह वेलनेस पर्यटन सुरू केले आहे. यामुळे या वाढत्या क्षेत्रात, आम्ही देत असलेल्या सेवांचा आणखी विस्तार होत आहे. हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि पर्यटनाचे खरे राजदूत तुम्हीच आहात. सध्या करत असलेल्या अतुलनीय कार्यासाठी, विशेष ओळख मिळण्यास तुम्ही पात्र आहात.”

पर्यटन संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस म्हणाले, कि “गोव्याचे पर्यटन क्षेत्र म्हणजे सामूहिक प्रयत्न आहेत. मुख्य भागधारकांच्या सूचना आणि सहभाग हे सुनिश्चित करते, की आम्ही गोव्याची विशेष ओळख जपत वाढत्या मागण्या पूर्ण करत राहू. आजच्या चर्चेने अधिक समन्वित आणि प्रभावी पर्यटन व्यवस्थापनाचा मार्ग मोकळा केला आहे. विशेषत: आम्ही गोव्याच्या सेवा वाढवणाऱ्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करतो, जसे की नवनिर्मित पर्यटनाकडे आमचा कल आहे. या दृष्टिकोना अंतर्गत आम्ही अनेक महिला उद्योजकांना ‘होमस्टे’ धोरणाद्वारे सक्षम केले आहे. आम्ही राज्यातील रहिवाशांसाठी रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण केल्या आहेत. यातून हे सिद्ध होते, की या पर्यटन उपक्रमांचा प्राथमिक भर हा नेहमीच स्थानिक समुदायांच्या भल्यासाठी असेल.”

पर्यटन भागधारकांच्या आउटरीच कार्यक्रमाने प्रमुख भागधारकांना सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यास, उपाय सुचविण्यास आणि राज्याचे शाश्वत उद्दिष्ट प्रतिबिंबित करणारे पर्यटन धोरण तयार करण्यासाठी, पर्यटन विभागाशी सहयोग करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले आहे. या कार्यक्रमाने पारंपारिक पर्यटन क्षेत्रांना चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी दिली आहे. त्याचबरोबर सर्वसमावेशक सरकारी पाठिंब्याच्या आधारावर पुनरुत्पादित पर्यटनासह नवीन सेवांचा देखील प्रचार केला आहे.

गोवा हे स्पर्धात्मक, पर्यावरणाबाबत जागरूक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अस्सल जागतिक गंतव्यस्थान राहील, याची खात्री करून, पर्यटन सेवांची एकूण गुणवत्ता मजबूत करणे, हे सर्व भागधारकांना सामावून घेताना, पर्यटन विभागाचे ध्येय आहे.

जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग), श्री. दिपक नार्वेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी कार्यक्रमाच्या विविध सत्रांमध्ये अखंड चर्चा सुनिश्चित केली. गोव्यातील विकसनशील पर्यटन उद्योगाशी संबंधित, अभ्यासपूर्ण किस्से सांगून त्यांनी उपस्थितांना चर्चांमध्ये सामावून घेतले.

जीटीडीसीचे सरव्यवस्थापक, श्री. गॅविन डायस यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनी भागधारकांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले आणि सतत प्रतिबद्धता आणि सहयोगाद्वारे पर्यटन उद्योगाला पाठिंबा देण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें