गुणवंत एससी/एसटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीची मोफत लॅपटॉप अर्ज प्रक्रिया खुली*

.

*गुणवंत एससी/एसटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीची मोफत लॅपटॉप अर्ज प्रक्रिया खुली*

*आल्तिनो, ३० सप्टेंबर, २०२४:* गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागाने, अनुसूचित जमाती (एसटी) आणि अनुसूचित जाती (एससी) समुदायातील गुणवंत विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी, शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ साठीचे मोफत लॅपटॉप योजनेचे अर्ज उपलब्ध असल्याची घोषणा केली आहे.

गोवा सरकारच्या आयटीईअँडसी विभागाने एससी/एसटी समुदायातील विद्यार्थ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि डिजिटल कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, ही योजना सुरू केली आहे. या विद्यार्थ्यांना योजनेद्वारे आयटी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. आवश्यक डिजिटल साधने पुरवून, हा उपक्रम अनुसूचित जाती/जमातींच्या विद्यार्थ्यांना, तंत्रज्ञानावर आधारित जगात पुढे येण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह सक्षम बनवतो.

या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना, अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. हे संकेतस्थळ ३० सप्टेंबर २०२४ पासून सुरु होईल. तर ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत असेल. अधिक तपशीलांसाठी आणि अर्ज सादर करण्यासाठी, विद्यार्थी https://merit.goa.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें