गोव्याच्या पर्यावरण रक्षणाप्रती ‘माँडेलीझ इंडिया’चा पुढाकार — म्हापसा येथील प्रस्तावित लाइटहाउस प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पणजीत उद्घाटन — पाच वर्षांसाठी सरकारच्यावतीने सामंजस्य करार

.

गोव्याच्या पर्यावरण रक्षणाप्रती ‘माँडेलीझ इंडिया’चा पुढाकार

— म्हापसा येथील प्रस्तावित लाइटहाउस प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पणजीत उद्घाटन
— पाच वर्षांसाठी सरकारच्यावतीने सामंजस्य करार

पणजी (प्रतिनिधी) ः
माँडेलीझ इंडियाने गोव्यातील म्हापसा येथील ‘लाइटहाउस प्रोजेक्ट’च्या माध्यमातून फ्लास्टिक सर्क्युलर अर्थव्यवस्थेसाठी पुढाकार घेतला असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजीत लाइटहाउस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. माँडेलीस इंडियाने 100 टक्के रिसायकल्ड फ्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या ‘फिशरमन कास्टिंग नेट’च्या प्रतिकात्मक कलात्मक मांडणशिल्पाचेही अनावरण केले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमवेत पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, राज्य प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, माँडेलीझ इंडियाचे समीर जैन, ओब्रा भाटिया आदी उपस्थित होते.
माँडेलीझ इंडियाने पाच वर्षांसाठी सरकारच्यावतीने म्हापसा पालिकेसमवेत सामंजस्य करार केला आहे. याद्वारे म्हापशातील 1000 मेट्रिक टन फ्लास्टिक कचरा भरावक्षेत्रात न टाकता फ्लास्टिक पुनर्वापराचे प्रारूप तयार करण्यासाठी वापरला जाणार आहे.
शाश्वतता व पर्यावरणाच्या रक्षणाप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करत, माँडेलीझ इंडियाने म्हापसा येथे ‘लाइटहाउस प्रोजेक्ट’ला अधिकृतरित्या सुरुवात केली. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि म्हापसा नगरपालिका यांच्या सहयोगाने राबवल्या जाणाऱया या पाच वर्षांच्या उपक्रमाचे कचरा व्यवस्थापनातील महत्त्वाच्या आव्हानांवर मात करण्याचे आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे उद्दिष्ट आहे. 1,000 मेट्रिक टनांहून अधिक फ्लास्टिक कचरा अन्यत्र वळवण्याचे काम हा प्रकल्प करत आहे.
म्हापसा नगरपालिकेच्या सहयोगाने राबवल्या जाणाऱया लाइटहाउस प्रकल्पामध्ये अंमलबजावणी सहयोगी म्हणून अनुभूती वेलफेअर फाउंडेशन (एडब्ल्यूएफ) आणि कामकाज (ऑपरेशन्स) सहयोगी म्हणून रिस्पॉन्सिबल अर्थ फाउंडेशन (आरईएफ) समावेश करण्यात आला आहे.
प्र्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये ‘फ्लॉग रन’चाही समावेश होता. स्थानिक समुदायाला सहभागी करून घेणे आणि त्यायोगे शाश्वत भवितव्यासाठी सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरिखेत करणे हे त्यामागील उद्दिष्ट होते. त्यात एक्स्टेण्डेड प्रोडÎुसर रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात ईपीआर (उत्पादकाची विस्तारित जबाबदारी) या विषयावरील एक माहितीपूर्ण सादरीकरणही करण्यात आले. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिटÎूट यांच्यातर्फे एका माहितीपर व्हिडिओद्वारे सर्वोत्तम पद्धती दाखवण्यात आल्या.

चौकट करा…
फ्लास्टिक वापरात गोवा पुढे ही खेदाची बाब ः मुख्यमंत्री
फ्लास्टिकच्या वापरात गोवा राज्य देशात पुढे आहे, ही बाब खेदाची आहे. यासाठी फ्लास्टिकचा वापर कमीत कमी करून पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रियेवर भर देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणारे आपले गोवा राज्य हरित आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्घाटनानंतर व्यक्त केले.

कोट करा…
लोकांचा सहभाग महत्त्वाचा
माँडेलीझ इंडियाचे अध्यक्ष समीर जैन म्हणाले, “शाश्वतता हा आपल्या देशाच्या धोरणात्मक वाढीच्या स्तंभांपैकी एक आहे. लाइटहाउस प्रकल्पातून आमची फ्लास्टिकच्या पुनर्वापराप्रती बांधिलकी स्पष्ट होते. शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या सरकारच्या उद्दिष्टाशी हे सुसंगत आहे. हा प्रकल्प तीन महत्त्वाच्या स्तंभांवर उभा आहे- वर्तनातील बदल, पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण आणि डिजिटल नवोन्मेष. कचरा संकलनात सुधारणा, शाश्वततेला उत्तेजन आणि लोकांचा सहभाग यांच्या माध्यमातून आम्ही व्यापक वर्तुळाकार अर्थव्यवस्थेसाठी पार्श्वभूमी तयार करत आहोत.”

फोटो ओळी….
‘माँडेलीज इंडिया’ने गोव्याला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत मंत्री आलेक्स सिक्वेरा, ओब्रा भाटिया, महेश पाटील, समीर जैन.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar