किक ऑफ फुटबॉल स्कूलमध्ये साहील तवोराकडून प्रशिक्षणार्थींना प्रेरणा

.

 

२१ ऑक्टोबर

किक ऑफ फुटबॉल स्कूलमध्ये साहील तवोराकडून प्रशिक्षणार्थींना प्रेरणा

पणजी: एफसी गोवा स्टार साहील तावोरा याने सोमवारी किक ऑफ फुटबॉल स्कूल्स (केओएफएस) सांता क्रुझ केंद्राला भेट दिली. ४ ते १५ वर्षे वयोगटातील ४० हून अधिक प्रशिक्षणार्थींसह त्यांचे पालक देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी सत्रात ४ विरुद्ध ४ खेळाडूंचे सामने झाले. प्रशिक्षणार्थींनी साहीलला प्रश्नविचारुन त्याच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. स्वाक्षरीच्या सत्रात साहीलने उपस्थित खेळाडूंसह त्यांच्या पालकांना देखील निराश न करता उमेदीने स्वाक्षरी दिल्या.
तावोराने या वेळी बोलताना यश मिळवण्यासाठी समर्पण, शिस्त आणि उत्कटतेच्या महत्त्वावर भर दिला. या कार्यक्रमाने युवा खेळाडूंना प्रेरणा दिली. ग्रासरुट स्तरावर फुटबॉलचा विकास करण्याचे ध्येय बाळगलेल्या ‘केओएफएस’ला यामुळे बळकटी मिळाली तसेच पुढील पिढीतील फुटबॉलपटू घडविण्यासाठी प्रेरणा देखील मिळाली.
किक ऑफ फुटबॉल स्कूलमध्ये येऊन मला खूप आनंद झाला. लहान मुलांना, त्यांच्या पालकांसह, दररोज प्रशिक्षणासाठी येताना पाहून खूप आनंद होतो. ५ वर्षांपर्यंत लहान मुले प्रशिक्षण घेताना दिसली. सुरुवात करण्यासाठी हे एक उत्तम वय आहे. आशा आहे की, काही केवळ आयएसएलमध्येच नव्हे तर पुढेही व्यावसायिक फुटबॉलपटू बनतील. मी मुलांशी संवाद साधताना खूप छान वेळ घालवला आणि केओएफएसला शुभेच्छा देतो, असे साहीलने माध्यमांना संबोधित करताना सांगितले.
‘केओएफएसच्या संस्थापक अँड्रिया फर्नांडिस यांनी हा कार्यक्रम संस्मरणीय बनवल्याबद्दल विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण केओएफएस परिवाराचे आभार मानले.
केओएफएसचे मुख्य प्रशिक्षक जोनास फर्नांडिस यांनी ठळकपणे सांगितले की साहील तावोरासोबत हे सत्र सर्व प्रशिक्षणार्थींना शिकण्याची, प्रश्न विचारण्याची आणि व्यावसायिक स्तरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्या व्यक्तीकडून प्रेरित होण्याची एक उत्तम संधी होती.
आम्ही साहील तावोरासोबत संवाद साधला. आमची सनशाईन आणि सांता क्रुझ या दोन्ही केंद्रांमधील मुले एकत्र आली. साहीलला केंद्रस्थानी ठेवून, त्याला बरेच प्रश्न विचारून आणि फोटो काढण्याच्या आणि ऑटोग्राफ घेण्याच्या संधीचा आनंद घेतल्याने मुले रोमांचित झाली. साहीलने त्याची फुटबॉलमधील वाटचाल कथन केली. खेळात चढ-उतार येत असतात. कधीकधी दुखापती होतात, कधी ‘अंतिम ११’मध्ये स्थान मिळत नाही. तरीसुद्धा याचा परिणाम आपल्या प्रशिक्षणावर होऊ देऊ नका. शिस्तीचा अवलंब करा, असे आवाहन त्याने केले आणि प्रश्नांची उत्तरे दिली. एकूणच, मुलांसाठी हा एक विलक्षण अनुभव होता आणि त्यातून ते काहीतरी शिकू शकतात, असे जोनास फर्नांडिस म्हणाले. एफसी गोवाच्या या स्टारला भेटून मुले आणि त्यांचे पालक दोघेही आनंदित झाल्याने सत्राचा शेवट मोठ्या उत्साहात झाला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar