फोंडा, २६ ऑक्टोबर – हिंदु जनजागृती समितीने यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान आरंभले आहे. या अंतर्गत समितीच्या शिष्टमंडळाने २६ ऑक्टोबर या दिवशी फोंडा येथे गोवा बागायतदार संस्थेचे संचालक श्री. नरेंद्र सावईकर यांची भेट घेऊन त्यांना ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये तपोभूमी येथील श्री संत समाजाचे सर्वश्री विराज ढवळीकर, गोमंतक संत मंडळ कीर्तन विद्यालयाचे देवानंद सुर्लकर, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक, सनातन संस्थेचे नारायण नाडकर्णी व वसंत सणस यांचा समावेश होता.
गेल्या काही वर्षांपासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. भारत सरकारच्या अधिकृत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय? ‘हलाल प्रमाणिकरण’ व्यवस्थेतून मिळणार्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. या अघोषित हलाल सक्तीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान राबवले जात आहे. आस्थापनांनी अशा प्रकारच्या हलाल प्रमाणित उत्पादनांची विक्री थांबवून ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन समितीने केले आहे.