जीटीडीसीला सर्वाधिक प्रभावशाली पर्यटन महामंडळासाठी ‘चाणक्य पुरस्कार २०२४’ प्रदान*

.

*जीटीडीसीला सर्वाधिक प्रभावशाली पर्यटन महामंडळासाठी ‘चाणक्य पुरस्कार २०२४’ प्रदान*


गोवा, १० नोव्हेंबर २०२४: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील योगदानासाठी, गोवा पर्यटन विकास महामंडळाला (जीटीडीसी) भारतीय जनसंपर्क परिषदेने (पीआरसीआय) सर्वाधिक प्रभावशाली पर्यटन महामंडळाच्या श्रेणीतील, प्रतिष्ठित ‘चाणक्य पुरस्कार २०२४’ ने सन्मानित केले आहे.

माननीय केंद्रीय ऊर्जा तथा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री, श्री. श्रीपाद येसो नाईक यांनी जीटीडीसी मार्केटिंग उपमहाव्यवस्थापक, श्री. दीपक नार्वेकर यांना हा पुरस्कार प्रदान केला. पीआरसीआयच्या मंगळूर येथील मोती महाल येथे आयोजित, १८व्या जागतिक कम्युनिकेशन परिषदेत श्री. नार्वेकर यांनी जीटीडीसीच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.

या समारंभाला ख्यातनाम मिस ग्लोबल इंटरनॅशनल २०२४ स्वीझेल मारिया फुर्तादो, पीआरसीआयचे संस्थापक अध्यक्ष एमेरिटस श्री. एम. बी. जयराम, पीआरसीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. गीता शकार व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून, कार्यक्रमाच्या भव्यतेत अधिक भर घातली.

सावर्डेचे आमदार तथा जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांनी या पुरस्काराबद्दल अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, कि “आम्हाला प्रतिष्ठित चाणक्य पुरस्कार २०२४ मिळाल्याचा अत्यंत अभिमान वाटतो. आम्हाला मिळालेली ही ओळख, पर्यटकांना अविस्मरणीय सुट्ट्या, मुख्य निवासस्थानांमध्ये आरामदायी अनुभव आणि अनेक रोमांचक नवीन पर्यटन सेवा देण्याप्रती, आमच्या समर्पणाला बळकटी देते. रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग, स्कूबा डायव्हिंग आणि ट्रेकिंग कार्यक्रमांसह विविध साहसी उपक्रमांमधून तसेच हॉप-ऑन हॉप-ऑफ बस व गोवा माइल्स सेवेसारख्या सोयीस्कर प्रवास पर्यायांसह आणि इतर अनेक उपक्रमांद्वारे, आम्ही अभ्यागतांचा अनुभव वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही गोव्यातील पर्यटनाच्या मर्यादा ओलांडत राहू. तसेच करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून, राज्याच्या शाश्वत वाढीला आणि समृद्धीला पाठिंबा मिळेल याची खात्री बाळगू.”

या महत्त्वाच्या मान्यतेबद्दल बोलताना पर्यटन खात्याचे संचालक तथा जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, श्री. सुनील अंचिपाका, आयएएस म्हणाले, कि “हा पुरस्कार नाविन्यपूर्ण, पर्यावरणीय जबाबदार उपक्रमांद्वारे गोव्याच्या पर्यटनाचा कायापालट करण्याच्या आमच्या प्रयत्नांना मान्यता देतो. जीटीडीसी, आमच्या जीटीडीसीच्या निवासस्थानांद्वारे परवडणाऱ्या दरात राहण्याची सोय उपलब्ध करून तसेच साहसी उपक्रमांपासून ते सोयीस्कर प्रवासाच्या पर्यायांपर्यंत, अनेक रोमांचक पर्यटन सेवांसह सर्वांसाठी अविस्मरणीय अश्या सुट्ट्या उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व प्रकारच्या प्रवाश्यांसाठी, गोवा हे एक प्रमुख गंतव्यस्थान बनवण्याचा आमचा उद्देश आहे.

जीटीडीसी मार्केटिंग उपमहाव्यवस्थापक, श्री. दीपक नार्वेकर म्हणाले, कि “आम्हाला पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांच्याकडून मिळालेल्या दृढ पाठिंब्यामुळे, हे यश शक्य झाले आहे. गोव्यातील पर्यटन वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी, त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या सतत मार्गदर्शनाने, आम्ही नाविन्यपूर्ण सेवा आणि संस्मरणीय अनुभवांद्वारे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात अधिक कायापालट घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

भारतीय जनसंपर्क परिषद ही एक प्रमुख संस्था आहे, जी संपूर्ण भारतभर व्यावसायिक जनसंपर्क आणि संप्रेषण मानकांना प्रोत्साहन देते. या समारंभात भारत तसेच विदेशातील अनेक संस्था आणि व्यक्तींना त्यांच्या योगदानाची दखल घेऊन, विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या पुरस्काराद्वारे मिळालेली ओळख गोव्याला, वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि शाश्वत पद्धतींचा समावेश असलेल्या सर्वांगीण प्रवासाच्या गंतव्यस्थानात, रूपांतरित करण्याच्या जीटीडीसीच्या समर्पणावर प्रकाश टाकते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar