तबिलिसीमध्ये गोवा रोड शो २०२४: जॉर्जियासोबत पर्यटन बंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल*

.

*तबिलिसीमध्ये गोवा रोड शो २०२४: जॉर्जियासोबत पर्यटन बंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल*

पणजी, गोवा, ६ डिसेंबर २०२४ – गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने २ डिसेंबर २०२४ रोजी तबिलिसी, जॉर्जिया येथील हॉटेल विंडहॅम ग्रँड टिबिलिसी, स्काय व्हेन्यू येथे, गोवा रोड शो २०२४चे यशस्वीपणे आयोजन केले. या केवळ-निमंत्रितांसाठी असलेल्या कार्यक्रमाने गोव्याला, जॉर्जियन पर्यटकांसाठी आवश्यक असलेले प्रवासाचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी देण्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला.

या रोड शोने प्रवासी उद्योगातील भागधारक आणि माध्यम प्रतिनिधींसह उपस्थितांना, गोव्याच्या विशिष्ट सेवांविषयी सखोल माहिती दिली. पर्यटन संचालक, श्री सुनील अंचिपाका, आयएएस, यांनी गोव्याच्या अतुलनीय अश्या पर्यटन क्षमतेचे एक आकर्षक विहंगावलोकन सादर केले, ज्यात राज्याचे निसर्गरम्य समुद्रकिनारे, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि उत्सवांचे दर्शन घडवणाऱ्या विस्मयकारक व्हिडिओद्वारे पूरक ठरले.

या कार्यक्रमाच्या यशाबद्दल भाष्य करताना पर्यटन संचालक, श्री सुनील अंचिपाका, आयएएस, म्हणाले, कि “जॉर्जियन बाजारपेठ गोव्याच्या पर्यटनासाठी खूप मोठे आश्वासन आहे. या रोड शोद्वारे, आम्ही सखोल संबंध प्रस्थापित करणे, गोव्याचे अतुलनीय अनुभव प्रदर्शित करणे आणि जॉर्जियन प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणे, हे उद्दिष्ट ठेवले होते. आम्हाला खात्री आहे, की या उपक्रमामुळे गोवा राज्य कोणत्या सेवा व अनुभव देत आहे, याविषयी त्यांची समज वाढेल आणि परिणामी, गोव्यात जॉर्जियातील चार्टर आणि पर्यटकांचे स्वागत अधिक प्रमाणात करणे, शक्य होईल.”

या कार्यक्रमाची संध्याकाळ राज्याच्या कलात्मक चवीने जिवंत झाली. एका आकर्षक प्रश्नोत्तर सत्राने जॉर्जियन भागधारकांना अंतर्दृष्टी सामायिक करण्यास आणि प्रवासाचे अनुभव सुधारण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यास पुढे संधी दिली. गोवा पर्यटन प्रतिनिधींसोबत झालेल्या वैयक्तिक भेटींमुळे वैयक्तिक लक्ष देत, अर्थपूर्ण सहकार्यांला चालना देण्यात आली.

तबिलिसी येथील गोवा रोड शो २०२४ची सांगता, पर्यटन संबंध मजबूत करण्याच्या नव्या उत्साहाने झाली. या कार्यक्रमामुळे गोवा पर्यटन येथील संस्कृती आणि अनुभव पुढे नेताना, गोव्यातील किनाऱ्यावर अधिक जॉर्जियन अभ्यागतांचे स्वागत करण्याबद्दल आशावादी आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें