पीपल्स विद्यालयात गोवा मुक्तीदिन उत्साहात

.

पीपल्स विद्यालयात गोवा मुक्तीदिन उत्साहात

पणजी: मळा-पणजी येथील पीपल्स विद्यालयाने विद्यार्थ्यांना घडविण्याचे , त्यांना आकार देण्याचे नि विद्यार्थ्यांमध्ये नीतीमुल्ये रुजविण्याचे काम नेहमीच केले अन् आजही ते अव्याहतपणे चालू आहे, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध गोमंतकीय फॅशन डिझायनर नि पीपल्सच्या माजी विद्यार्थीनी अक्षदा खंवटे यांनी काढले. पीपल्स विद्यालयाने आयोजित केलेल्या ६४व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी पीपल्समधल्या आपल्या शालेय जीवनातील स्मृतींनाही उजाळा दिला .
याप्रसंगी पीपल्स शैक्षणिक न्यासाचे व्यवस्थापकीय विश्वस्त राहूल देशपांडे , विश्वस्त शिल्पा देशपांडे , पीपल्सच्या विविध विभागांचे प्रमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गोवा मुक्तिसंग्रामावर आधारित विविध कार्यक्रम तसेच देशभक्तिपर गीते सादर केली. साक्षी सिंग या उच्च माध्यमिक विद्यार्थिनीने गोवा मुक्तिदिनाचे महत्व कथन केले . त्यानंतर पीपल्सच्या विद्यार्थी मंडळातर्फे शानदार संचलन झाले.

गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधून यावेळी पुढील शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नूतन विद्यार्थी मंडळाकडे अधिकारपदाची सूत्रे सोपविण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री नाईक व सोनाली शेणवी होडारकर या शिक्षिकांनी केले. या कार्यक्रमाला पीपल्स परिवारातील सर्व सदस्यांबरेबरच डॉ .दादा वैद्य बी.एड . कॉलेज व विद्याप्रबोधिनी बी.एड. कॉलेजच्या प्रशिक्षणार्थींचीही उपस्थिती होती.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें