गोवा राज्याकडून सेवांमध्ये सार्वजनिक प्रवेश सुलभ करण्यासाठी वनमॅप गोवा जीआयएस पोर्टलच्या लॉन्चची घोषणा*

.

*गोवा राज्याकडून सेवांमध्ये सार्वजनिक प्रवेश सुलभ करण्यासाठी वनमॅप गोवा जीआयएस पोर्टलच्या लॉन्चची घोषणा*

*गोव्यातील पायाभूत सुविधा, लोकसंख्याशास्त्र आणि संसाधनांविषयी सहज जाणून घेण्यासाठी एकल वापरकर्ता-अनुकूल व्यासपीठ*

*नेव्हिगेशन, सर्व्हिस लोकेटर, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि फीडबॅक सबमिशन ही वैशिष्ट्ये समाविष्ट*

*डिजिटल क्रांतीच्या दिशेने एक पाऊल, ई-प्रशासन आणि डिजिटल समावेशनाचा प्रचार*

*पणजी, २९ डिसेंबर २०२४*: ई-प्रशासन आणि शहरी नियोजनातील प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना, माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माननीय पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, प्रिंटिंग आणि स्टेशनरी मंत्री, श्री रोहन ए. खंवटे यांनी पर्वरीतील मंत्रालयात निर्णयक्षमता आणि नागरिक सेवा वाढविण्यासाठी भू-स्थानिक माहिती एकत्रित करणारे एक अभिनव व्यासपीठ, वनमॅप गोवा जीआयएस पोर्टलचे अनावरण केले.

गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीई अँड सी) विभागाने विकसित केलेले हे पोर्टल, सरकारी संस्था आणि जनतेसाठी वन-स्टॉप उपाय म्हणून डिझाइन केले आहे. हे वापरकर्ता-अनुकूल इंटरफेसद्वारे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा, लोकसंख्याशास्त्र आणि संसाधन माहितीमध्ये प्रवेश प्रदान करते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, कि “या पोर्टलच्या शुभारंभामुळे, गोवा राज्य डिजिटल क्रांतीमध्ये लक्षणीय प्रगती घडवून आणत आहे. वनमॅप गोवा जीआयएस पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक विभागांकडून माहिती मिळवून, ई-प्रशासनामध्ये क्रांती घडवून आणेल.”

डीआयटीई अँड सी मंत्री श्री रोहन ए. खंवटे यांनी या उपक्रमाच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, कि “जीआयएस माध्यम हे ई-प्रशासन आणि डिजिटल गोवाचे आमचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. माहिती अचूक आणि विश्वासार्ह असल्याची खात्री करून, एका एकीकृत प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण भू-स्थानिक माहिती मिळविणे सुलभ करते.

हे पोर्टल सरकारी माहिती एकाच ठिकाणी शोधण्यासाठी साधने प्रदान करते. पॅन, झूम आणि “माय लोकेशन” यासारख्या वैशिष्ट्यांचा वापर करून, नागरिक या प्लॅटफॉर्मवर नेव्हिगेट करू शकतात. यावर असलेली अतिरिक्त साधने वापरकर्त्यांना जवळपासच्या सेवा शोधण्यास, माहितीचा मागोवा घेण्यास, नकाशे सामायिक करण्यास, अंतर मोजण्यास आणि फोटो किंवा व्हिडिओंसह अभिप्राय प्रदान करण्यास अनुमती देतात. स्टेटस ट्रॅकर हा वापरकर्त्यांना त्यांच्या जमा केलेल्या माहितीविषयी अध्ययावत ठेवतो.

हे पोर्टल डिजिटल प्रशासन आणि शाश्वत विकासात आघाडीवर राहण्याच्या गोव्याच्या ध्येयाला समर्थन देते. वनमॅप गोवा जीआयएस पोर्टलचे उद्दिष्ट अधिक कार्यक्षम प्रणालीसाठी नियोजन आणि निर्णय प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, हे आहे. या पोर्टलविषयी अधिक जाणून घेण्यासाठी https://onemapgoagis.goa.gov.in/ येथे भेट दया.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें