हिंदू रक्षा महाआघाडी’ची पणजी येथे धरणे आंदोलनाद्वारे मागणी

.

*सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोजन करण्यास अनुमती देऊ नका !
 पणजी, ७ जानेवारी  – शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) या वारसा स्थळी फेस्ताचे आयोजन करण्यास पुरातत्व खात्याने अनुमती देऊ नये, अशी मागणी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ने ७ जानेवारी या दिवशी आझाद मैदान, पणजी येथे आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाद्वारे केली आहे. ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी चर्च संस्थेच्या वतीने ७ जानेवारीपासून फेस्ताचे आयोजन केले जात आहे आणि हे फेस्त १६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. फेस्ताच्या आयोजनासाठी वारसा स्थळी गेल्या काही दिवसांपासून अखोरात्र अनधिकृतपणे मंडप उभारणी आदी कामे जोमाने चालू आहेत. या पार्श्वभूमीवर ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ने ही मागणी केली आहे. या वेळी आंदोलनामध्ये ‘हिंदू रक्षा महाआघाडी’, ‘भारत माता की जय’, ‘हिंदु जनजागृती समिती, ‘गोमंतक मंदिर महासंघ’ आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे सर्वश्री नितीन फळदेसाई, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे सत्यविजय नाईक यांनी धरणे आंदोलनाविषयी माहिती दिली.
आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या
१. वारसा स्थळी कोणत्याही अनधिकृत बांधकामांना अनुज्ञप्ती देऊ नये.
२. वारसा स्थळी अनधिकृत बांधकाम केल्याचे पुरातत्त्व खाते आणि वास्को नियोजन आणि विकास प्राधीकरण यांच्या संयुक्त सर्वेक्षण अहवालात नमूद केलेले आहे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची सूचना जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांना करण्यात आली आहे, तरीही अनधिकृत बांधकामांवर कोणतीच कारवाई न करणार्‍या संबंधित कर्तव्यचुकार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी.
३. वारसा स्थळी उभारण्यात आलेले अनधिकृत क्रॉस त्वरित हटवावे
४. फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ म्हणजेच पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाणाची पावित्रता अबाधित ठेवावी.
५. वारसा स्थळी भूमीत गाढलेले मंदिराचे अवशेषांचे उत्खनन करावे.
आपला विश्वासू,
श्री.नितीन फळदेसाई, हिंदू रक्षा महाआघाडी
(संपर्क क्रमांक ९७६५३ ९११०८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें