पीपल्सच्या प्राची शामेनचे
ऑलिम्पियाड परिक्षेत सुयश
इंटरनँशनल ऑलिम्पियाड फाउंडेशनने आयोजित केलेल्या ” रिझनिंग अँड अँप्टिटयूड ” ऑलिम्पियाडमध्ये मळा -पणजी येथील पीपल्स माध्यमिक विद्यालयाच्या प्राची शामेन या नववीच्या विद्यार्थिनीने पश्चिम विभागात प्रथम श्रेणी (झोनल टॉपर) प्राप्त केली आहे. गणित ऑलिम्पियाड परिक्षेतही तीने कांस्यपदक पटकावले आहे. नुकताच तिचा चषक , पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.