*वेदांता सेसा गोवाकडून आमोणा येथे ५४वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा*
वेदांता सेसा गोवाने, ५४व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त (एनएसडब्ल्यू) परिणामकारक आशा कार्यक्रमांच्या मालिकेसह सुरक्षा प्रोटोकॉल आणि सुरक्षित व जबाबदार कामकाज सुनिश्चित करण्यासाठी, आपली वचनबद्धता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा सप्ताह साजरा केला. कंपनीच्या ‘सेफ्टी इज अस’ उपक्रमाचा एक भाग म्हणून ५४व्या एनएसडब्ल्यूचा सात दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याचा उद्देश वर्धित जागृती आणि सामूहिक जबाबदारीच्या भावनेद्वारे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता अभेद्य करणे, हा आहे.
या वर्षीच्या एनएसडब्ल्यूची “विकसित भारतासाठी सुरक्षा आणि कल्याण महत्त्वपूर्ण” ही संकल्पना, विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात सुरक्षा आणि कल्याणाचे महत्त्व अधोरेखित करते. संपूर्ण आठवडाभर, कर्मचारी आणि व्यावसायिक भागीदारांना सुरक्षिततेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल शिक्षित करण्यासाठी अनेक जागरुकता सत्रे, सुरक्षा प्रात्यक्षिके, सुरक्षा कवायती आणि संवादात्मक प्रश्नमंजुषा हे कार्यक्रम नियोजित करण्यात आले. उद्घाटनाच्या दिवशी घेतलेली सुरक्षा प्रतिज्ञा, सर्वांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यावर वेदांताचे लक्ष अधिक बळकट करते.
*या प्रसंगी सेसा गोवा, वेदांता लिमिटेडचे सीईओ श्री नवीन जाजू यांनी, कंपनीत सुरक्षाची संस्कृती वाढवण्यावर भर देताना सांगितले, की* “सेसा गोवा येथे आम्ही सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही ‘सेफ्टी इज अस’ या संकल्पनेचे पालन करतो. तसेच आमची जबाबदारी एकत्रितपणे व नियमितपणे राबवतो. सक्रिय मानसिकता, सामूहिक सहभाग, शिष्टाचार पालन, नवनवीन तंत्रज्ञान, तत्पर अहवाल आणि रेकॉर्डिंग तसेच प्रक्रियांचे सतत मूल्यांकन करण्याची आमची क्षमता, हे सर्व उपाय आमचे कार्यस्थळ नेहमीच सुरक्षित राहील, हे सुनिश्चित करते. आपण काम करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत सुरक्षितता अंतर्भूत असेल, असे कामाचे ठिकाण तयार करण्याची खात्री करून, आपण #विकसित भारतच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देऊया.
*वेदांता व्हीएबीच्या सक्रिय सुरक्षा उपक्रमांवर बोलताना, श्री सप्तेश सरदेसाई, सीईओ – व्हीएबी आणि सिमेंट म्हणाले*, की “वेदांता व्हीएबीमध्ये, सुरक्षितता हा आमच्या व्यावसायिक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे नवंनवीन औद्योगिक स्तर स्थापित करण्यासाठी आमची सुरक्षा नियमावली, मजबूत करण्याच्या दिशेने सतत काम करत आहोत. यात नावीन्य, मजबूत सुरक्षा ऑडिट, मॉक ड्रिल आणि क्रिटिकल रिस्क मॅनेजमेंट याच्या मदतीने हे काम अखंडपणे सुरू आहे. मनुष्य-मशीन परस्पर संवाद कमी करण्यासाठी आणि सुरक्षित कार्यस्थळ तयार करण्यासाठी आम्ही सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेसह (एआय टूल्स) डिजिटल हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी सर्वोच्च सुरक्षा मानके कायम ठेवण्यासाठी आणि आमच्या समुदायासाठी सुरक्षित व कल्याणमय संस्कृती वाढवण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत.”
*श्री. सागर परभ, मेकॅनिकल फिटर, व्हीएबी, यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले*, की “वेदांता सेसा गोवा येथे, सुरक्षा केवळ नियमांपुरती मर्यादित नाही; तर ती रोज आमच्या कुटुंबाकडे परतणे इथपर्यंत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाने आम्हाला आठवण करून दिली, की प्रत्येक लहान कृती मग ती संरक्षणात्मक गियर परिधान करणे, प्रक्रियांचे पालन करणे आणि एकमेकांना मदत करणे, यामुळे सुरक्षेत फरक पडतो. ड्रिल आणि वास्तविक जीवनातील सुरक्षितता स्थिती ही डोळे उघडणारी होती, ज्यामुळे आम्हाला अधिक तयारी आणि आत्मविश्वास वाटू लागला. अभिप्राय घेण्याची एक मजबूत प्रणाली आहे, जी हे सुनिश्चित करते की सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे. आमची सुरक्षा हेच कंपनीसाठी प्राधान्य आहे, हे जाणून घेताना मला आणि माझ्या टीमला दररोज जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळते.”
वेदांता सेसा गोवाचे कार्य पाच राज्यांमध्ये पसरलेले आहे आणि कामकाज सुरक्षित आणि जबाबदारीने व्हावे, यासाठी त्यांचे सुरक्षा प्रोटोकॉल नियमितपणे अद्ययावत केले जाते. यात अलीकडेच एआय कॅमेरे, स्लोप सेफ्टी रडार आणि सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी आणि अहवाल सुधारण्यासाठी विशेष क्युरेट केलेले सॉफ्टवेअर समाविष्ट केले आहे. सुरक्षित कार्यप्रदर्शन वाढविण्यासाठी आणि सुरक्षितता ही एक सामायिक जबाबदारी आहे, अशी संस्कृती निर्माण करण्यासाठी कंपनी अत्याधुनिक सुरक्षा उपाय आणि डिजिटल हस्तक्षेप याला एकत्रितपणे राबवित आहे.