गोव्यातील मणिपाल हॉस्पिटल तर्फे एसआयआरटी या यकृताच्या ट्युमरवरील उपचारांमध्ये क्रांतिकारी उपायांची सुरुवात*

.

*गोव्यातील मणिपाल हॉस्पिटल तर्फे एसआयआरटी या यकृताच्या ट्युमरवरील उपचारांमध्ये क्रांतिकारी उपायांची सुरुवात*

*गोवा, १७ एप्रिल २०२५-* गोव्यातील मणिपाल हॉस्पिटलने आपल्या कार्यात आणखी एक नवीन मैलाचा दगड पार केला असून ॲडव्हान्स्ड कॅन्सर केअर मधील उपचारामध्ये सिलेक्टिव्ह इंटर्नल रेडिएशन थेरपी (एसआयआरटी) ची सुरुवात केली असून या उपचार पध्दतीला ट्रान्सटेरियल रेडिओमोबिलायझेशन (टेअर) असेही म्हणतात, हे उपचार यकृताच्या ट्युमरवर विशेषत्वाने दिले जातात. या कार्यक्रमाचे नाव ‘एसआयआरटी- अ गेम चेंजर इन लीव्हर ट्युमर’ असे ठेवण्यात आले असून याचे आयोजन मणिपाल हॉस्पिटल गोव्याचे चीफ ऑफ रेडिओलॉजी आणि कन्सल्टंट- इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी डॉ. चारुदत्त जे संभाजी आणि न्युक्लियर मेडिसिनचे कन्सल्टंट डॉ. पंकज म्हात्रे यांनी केले होते. योवळी ऑन्कोलॉजी आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी क्षेत्रातील देश विदेशातील तज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हॉस्पिटलची अचूक आणि वैयक्तिक कॅन्सर केअर साठी असलेली वचनबध्दता अधोरेखित करण्यात आली.

या उपक्रमाचे महत्त्चपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सिंगापूर येथील नॅशनल कॅन्सर सेंटर चे सिनियर कन्सल्टंट सर्जन आणि ड्यूक-एनयूएस मेडिकल स्कूल चे प्रोग्राम डायरेक्टर आणि प्रोफेसर डॉ. प्रीस के एच चाऊ यांचे प्रमुख भाषण होय. त्यानंतरच्या सत्रांमध्ये गुरुग्राम येथील मेदांता दि मेडिसिटी येथील इंटरव्हेन्शनल आणि डायग्नोस्टिक रेडिओलॉजी विभागाचे चेअरमन डॉ. संजय बैजल यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑप्टिमायझिंग एसआयआरटी डोसिमेट्री ॲन्ड आऊटकम’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना डॉ.चारुदत्त यांनी सांगितले “ गोव्यातील मणिपाल हॉस्पिटल मध्ये एसआयआरटी ची सुरुवात म्हणजे या भागातील कॅन्सर केअर क्षेत्रातील मोठी झेप आहे. यामुळे जटील अशा यकृताच्या कॅन्सरशी लढा देत असलेल्या रुग्णांना नवीन आशा निर्माण होऊन इंटरव्हेन्शनल ऑन्कोलॉजी मध्ये आधुनिक उपचार पध्दती जवळ उपलब्ध झाल्या आहेत.”

दिवसेंदिवस कॅन्सरच्या केसेस मध्ये वाढ होत असतांना एसआयआरटी ही उपचारपध्दती यकृताच्या कॅन्सर साठी महत्त्वाची ठरत आहे. एसआयआरटी ही उपचारपध्दती यकृताच्या कॅन्सर मध्ये उदा. हेप्टोसेल्युलर कार्सिनोमा (एचसीसी) आणि मेटास्टॅटिक लीव्हर ट्युमर्स मध्ये विशेषत्वाने उपयुक्त ठरत आहे. यामध्ये रेडिओॲक्टिव्ह मायक्रोस्फीयरचा उपयोग करुन रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून ट्युमरवर उपचार केले जातात, ज्यामुळे रेडिएशन अचूकपणे होऊन आसपासच्या आरोग्यदायी पेशींचे किमान नुकसान होते. पार्टिकल शंटिंग पाहण्यासाठी टीसी ९९ एम एमएए स्कॅन करुन लॅब टेस्ट्स सह इमेज नुसार अभ्यास करुन प्रक्रियेपूर्वीची तयारी केली जाते. त्यानंतर रुग्णाला प्रमुख प्रक्रियेसाठी भरती केले जाते, यामध्ये छोट्या रेडिओॲक्टिव्ह बीड्सच्या माध्यमातून रक्तवाहिन्यांमधून यकृतात प्रवेश केला जातो. यावेळी रुग्णाला अगदी १-२दिवसांपर्यंत हॉस्पिटल मध्ये रहावे लागते.

डॉ. सालकर यांनी सांगितले “ एसआयआरटी ही एक केवळ प्रक्रिया नव्हे तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट्स, न्युक्लियर मेडिसिन स्पेशॅलिस्ट्स, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट्स, हेपॅटोलॉजिस्ट्स आणि मेडिकल आन्कोलॉजिस्ट यांच्या एकत्रित प्रयत्नांचा एक भाग आहे. आमचे लक्ष्य हे आहे की अत्याधुनिक उपचारांसह सहकार्यात्मक उपचार रुग्णाला देऊन त्याला अजोड अनुभव उपलब्ध करुन देणे.”

या उपक्रमाला विविध हॉस्पिटल्स सह विविध वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज तज्ञ उपस्थित होते, यांतून लीव्हर कॅन्सर मधील उपचारांसाठी सहकार्यात्मक उपचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. हॉस्पिटलचे प्रतिनिधी म्हणून सिनियर कन्सल्टंट – सर्जिकल ऑन्कोलॉजी डॉ. शेखर सालकर, मेडिकल ऑन्कोलॉजी चे कन्सल्टंट डॉ. जेकब जॉर्ज, कन्सल्टंट गॅस्ट्रोॲन्ट्रोलॉजी ॲन्ड हेपॅटोलॉजी डॉ. रोहन बडवे, कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. श्रीधरन एम, कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजी डॉ. वैभव शाक्य, आणि कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजी डॉ. सुजोय फर्नांडिस उपस्थित होते. त्याच बरोबर मणिपाल हॉस्पिटल्स व्यतिरिक्त कन्सल्टंट गॅस्ट्रोॲन्ट्रोलॉजिस्ट् डॉ. हरीष पेशवे, कन्सल्टंट गॅस्ट्रोॲन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संजय आळतेकर, कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जीन लुईस मेंझेनीज, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अनुपमा बोरकर हे ही कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञान वाटून क्लिनिकल जोडणीसाठी एक मंच उपलब्ध करुन देण्यात आला होता. यामुळे उपचार पध्दतीतील एसआयआरटीची भुमिका सुध्दा समजून घेऊन यकृताच्या कॅन्सर मध्ये कशा प्रकारे अचूकता आणता येईल यावरही चर्चा करण्यात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें