सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !*

.

Panjim

दिनांक : १७.०४.२०२५

*‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !*

*पणजी (गोवा)* – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी, गोवा येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी संकेतस्थळाचे अवलोकन केले, तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील पू. पृथ्वीराज हजारे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच श्री. नारायण नाडकर्णी, श्री. मधुसूदन कुलकर्णी आणि अधिवक्ता राजेश गावकर असे उपस्थित होते.

या संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन राष्ट्राचा शंखनाद करताचे भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह; सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय; सनातन संस्थेची माहिती; कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे संत, महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती; सांस्कृतिक कार्यक्रम; लोककला आदींची चित्रे प्रातिनिधिक चित्रे ठेवण्यात आली आहेत. पुढे कार्यक्रमाच्या दृष्टीने वेळोवेळी अधिकची माहिती या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सनातन संस्थेच्या वतीने या महोत्सवासाठी धर्मदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपला नम्र,
*श्री. चेतन राजहंस,*
प्रवक्ते, सनातन संस्था.
(संपर्क : ७७७५८५८३८७)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें