सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !* *रामनाथी-फोंडा-फर्मागुडी या मार्गावर १६ मेला वाहनफेरीचे आयोजन*

.

 

दिनांक : १५.०५.२०२५

*सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !*
*रामनाथी-फोंडा-फर्मागुडी या मार्गावर १६ मेला वाहनफेरीचे आयोजन*
फोंडा (गोवा) : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३व्या जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव यांच्या निमित्ताने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथील गोवा अभियांत्रिक महाविद्यालयाच्या पटांगणात १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १६ मे या दिवशी दुपारी ३ वाजता रामनाथी-फोंडा-फर्मागुडी या मार्गावर एका वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या फेरीला शुक्रवार, १६ मे या दिवशी दुपारी ३ वाजता रामनाथी येथील सनातन आश्रमाकडून धर्मध्वज पूजनाने प्रारंभ होणार आहे. यानंतर ही फेरी पुढे कवळे-दोन खांब-कपिलेश्वरी-तिस्क फोंडा-आयडी रुग्णालय रस्ता-शांतीनगर जंक्शन-कामत नर्सिंग होम-ओल्ड मार्केट-गोवा बागायतदार-फोंडा पोस्ट ऑफीस-पालिका उद्यानाजवळ वळसा घालून-फोंडा येथील जुने बसस्थानक-श्री हनुमान मंदिर, कुर्टी-छत्रपति शिवाजी महाराज किल्ला, फर्मागुडी या मार्गाने जाऊन फेरीचे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणात महोत्सवाच्या कार्यस्थळी सांगता होणार आहे. या फेरीमध्ये अधिकाधिक हिंदूंनी सहभागी होऊन सनातन हिंदू राष्ट्र स्थापनेच्या या कार्याला बळ देऊया, अशी विनंती आहे.

आपला नम्र,
*श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था.*
(संपर्क : ९९८७९२२२२२)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें