थिवी दिनांक 15(वार्ताहर )
इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्देश शाखे तर्फे 20 रक्त दात्येचा सन्मान.
14 जुन हा जागतिक रक्त दाता दिन म्हणून साजरा केला जातो. आज अनेकजण रक्तदान करतात म्हणून कित्तेकवेळा अनेकांचे प्राण वाचतात परंतु या रक्तदात्येची म्हणावी तशी दाखल कुणी घेत नाही. म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्देश शाखेतर्फे अशा रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व रक्तदानाबद्दल जागृती करण्यासाठी जागतीक रक्तदाता दिनी 20 रक्तदात्यांचा स्मृति चिन्न, प्रशस्ती पत्रक, कुटुंबासाठी भेट देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा मेडिकल कॉलेजचे हृदय शल्य विशारद डॉ. जगन्नाथ कोलवाळकर उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर रेड क्रॉस बार्देश शाखेचे अध्यक्ष प्रा. सुभाष कौठणकर, उपाध्यक्ष डॉ. दिगंबर नाईक, सचिव advocate ईशान उसापकर, खजिनदार मेहबूब विराणी, रेड क्रॉस गोवा चे व्यवस्थापकीय सदस्य सलीम इसानी उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. कोलवाळकर म्हणाले कि रक्तदान हॆ श्रेष्ठ दान आहे. एका रक्त दात्यामुळे तीन रुग्णांचा प्राण वाचू शकतो. आज प्रत्येक शास्त्रक्रियेवेळी रक्ताची नितांत गरज भासते. अनेकवेळा वेळीच एखादा रक्त गट उपलब्ध न झाल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जनजागृती करून रक्तदात्याची साखळी वाढवली पाहिजे. या साठी तरुण वयातच युवकांना रक्तदानचे महत्व पटवून दिले पाहिजे. या साठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी सारख्या संस्थानी पुढाकार घेऊन गावागावात जाऊन तसेच महाविद्यालयात जाऊन तरुणांना रक्तदान करण्याठी प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले. रक्ताची गरज ओळखून सरकारनेही अशा उपक्रमाना प्रोत्साहन दिले पाहिजे. आज रक्तदानात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होतात ही चांगली गोष्ट आहे असे ते म्हणाले.
आज सन्मान केलेल्या रक्तदात्यामध्ये दहा ते एकशे दोन वेळा रक्तदान केलेल्या सतीश गवंडळकर ( 10 वेळा ) आनंद कुलकर्णी, गिरीधर राऊळ, मनोज सावंत, हर्षद परब, कुलदीप कामत, रोहन मणेरकर, समीर सावंत, पुंडलिक राऊळ, सौ. सोनल पांढरे, महेश रेमुलकर, राजेश दळवी, सविओ पेरेरा, दयानंद देसाई, सॅम ब्रागांझा, पद्मानाथ गडेकर, लीना गोवेकर, जेम्स गोंसालवेस, ऐशली डिलेनी, संदीप वालावलकर (102 वेळा ) या रक्त दत्यांचा समावेश होता.
या वेळी संदीप वालावलकर, लीना गोवेकर, एशले डिलाने, सॅम ब्रागाझा, डॉ. दिगंबर नाईक यांनी रक्तदानचे महत्व सांगितले.
प्रा. सुभाष कौठणकर यांनी स्वागत केले, डॉ. हेथेल भक्ता यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, प्रा. नीता कौठणकर यांनी रक्तदात्यांची ओळख करून दिली, संतोष ढेकणे यांनी आभार मानले तर adv. ईशान उसपकर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : सन्मान पात्र रक्त दत्त्यांसोबत माध्यभागी बसलेले डॉ. जगन्नाथ कोलवाळकर, प्रा. सुभाष कौठणकर, मेहबूब विराणी, डॉ. दिगंबर नाईक व इतर