*गोवा पर्यटन टीटीएफ कोलकाता २०२५मध्ये नव्या युगातील अनुभवांचे करणार प्रदर्शन*
*पणजी, ८ जुलै २०२५* – कोलकाता येथे बिश्व बांगला मेळा प्रांगण या ठिकाणी १० ते १२ जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या आगामी ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर (टीटीएफ) कोलकाता २०२५ मध्ये राज्याच्या विकसित आणि गतिमान भावनेचे प्रदर्शन करण्यासाठी गोवा पर्यटन खाते सज्ज आहे. भारतातील सर्वात मोठे ट्रॅव्हल ट्रेड प्रदर्शन म्हणून ओळखले जाणारे टीटीएफ कोलकाता हे गोवा पर्यटनासाठी प्रमुख भागधारक आणि वाहतूक व्यावसायिकांशी जोडण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ प्रदान करते. त्याचबरोबर गोव्यातील समृद्ध पर्यटन क्षेत्र व्यापक प्रेक्षकांसमोर सादर करण्यास मदत करते.
*गोव्याच्या सहभागाबद्दल बोलताना, पर्यटन संचालक श्री केदार नाईक* म्हणाले, की “टीटीएफ कोलकाता हे विशेषतः पूर्व भारतात गोवा पर्यटनासाठी, एक महत्त्वाचे आउटरीच माध्यम आहे. गोवा हे केवळ एक गंतव्यस्थान नसून ते शाश्वतता, सांस्कृतिक जतन आणि समुदाय सहभागाने आकार घेतलेला अनुभव आहे, हे यंदा प्रेक्षकांना सांगण्याचे आम्ही उद्दिष्ट ठेवतो. या उपक्रमांद्वारे आम्ही राज्याचा शोध घेण्याच्या, अधिक जाणीवपूर्वक आणि समृद्ध मार्गाला प्रोत्साहन देत आहोत.”
या वर्षीच्या आवृत्तीत गोवा पर्यटन खाते त्यांच्या पुनरुत्पादित पर्यटन दृष्टिकोनाभोवती केंद्रित असलेल्या पारंपारिक आणि आधुनिक शाश्वततेचे आकर्षक मिश्रण अधोरेखित करेल. राज्याच्या सहभागातून पारंपारिक समुद्रकिनारी पर्यटनाच्या पलीकडे जाणाऱ्या उपक्रमांवर प्रकाश टाकला जाईल. त्याऐवजी ग्रामीण ट्रेल, मान्सून पर्यटन, कल्याण-आधारित अनुभव, आध्यात्मिक सर्किट आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन यावर लक्ष केंद्रित केले जाईल. पर्यटक एकादशा तीर्थ सर्किटबद्दल माहिती घेतील, हा एक आध्यात्मिक अनुभव आहे, ज्यामध्ये गोव्यातील अकरा पवित्र मंदिरे, क्युरेटेड हेरिटेज ट्रेल आणि समुदाय-आधारित होमस्टेद्वारे अस्सल खेड्यातील अनुभव समाविष्ट आहे.
या प्रदर्शनात एक भावनिक बाजू जोडणारा ‘ग्लो ऑन अरायव्हल’ हा उपक्रम आहे, जी गोव्याचे शांत मान्सून सौंदर्य, हिवागार परिसर, धुक्याने झाकलेल्या टेकड्या आणि पावसाने व्यापलेल्या वारसा स्थळांचे आकर्षण टिपणारी मोहीम आहे. हा उपक्रम विशेषतः पावसाळ्यात, जागरूक प्रवासाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो आणि गोव्याला विश्रांती, कायाकल्प आणि भावनिक अन्वेषणासाठी आदर्श ठिकाण म्हणून स्थान देतो.
गोवा पर्यटन दालनाला भेट देणारे पर्यटक क्यूआर-आधारित माहिती आणि तल्लीन करणारे व्हीआर अनुभव यासारख्या डिजिटल नवकल्पनांचा देखील शोध घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना गोव्याची विकसित होत असलेली ओळख एका अनोख्या परस्परसंवादी स्वरूपात पाहता येते. गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी जगभरातील ट्रॅव्हल एजंट्स, उद्योग नेते आणि पर्यटन मंडळांशी संवाद साधतील, कल्पनांची देवाणघेवाण करतील, सहकार्यांचा शोध घेतील आणि गोवा राज्य देशातील सर्वात बहुमुखी आणि जबाबदार पर्यटन स्थळांपैकी एक का आहे, हे दाखवतील.
गोवा दालनाला भेट देणारे पर्यटक दोन्ही राज्यांमधील एका अनोख्या सांस्कृतिक पुलाच्या रूपात फुटबॉल उत्साही, पाककृती आणि सामायिक उत्सवाची भावना यासारख्या क्षेत्रात पश्चिम बंगाल आणि गोवा यांच्यात समानता शोधू शकतात. हे सामान्य धागे या तीन दिवसांच्या मेळ्यात, परस्परसंवादी घटक आणि संभाषणांमध्ये प्रतिबिंबित होतील. याव्यतिरिक्त या स्टॉलवर, गोवा हॉलिडे पॅकेजसाठी स्पॉट बुकिंग सुलभ केले जाईल. अभ्यागत आणि पाहुण्यांना अधिकृत गोवा पर्यटन टीमच्या थेट मदतीने गोव्याच्या सहलीचे नियोजन करण्याची संधी मिळेल. तसेच सहभागीना गोव्यातील हॉटेल व्यावसायिक आणि टूर ऑपरेटर्सकडून एक अखंड आणि वैयक्तिकृत प्रवास अनुभव मिळेल.
गोवा पर्यटन सर्व व्यापारी अभ्यागतांना आणि प्रवास प्रेमींना टीटीएफ कोलकाता २०२५ मधील दालनाला भेट देण्यासाठी तसेच गोवा राज्य अस्सलपणा, नावीन्य आणि समावेशकतेद्वारे प्रवास कसा परिभाषित करत आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करते.