फक्त पाठ्यपुस्तकांचा अभ्यास म्हणजे शिक्षण नव्हे — दामोदर मावजो पीपल्स हायस्कूलचा संस्थापक दिन उत्साहात

.

फक्त पाठ्यपुस्तकांचा अभ्यास म्हणजे शिक्षण नव्हे — दामोदर मावजो
पीपल्स हायस्कूलचा संस्थापक दिन उत्साहात

 

शिक्षण हे फक्त पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नाही व नसावे.. क्रमिक पुस्तकांच्या चौकटी पलीकडे जाऊनही बरेच ज्ञान संपादन करता येते हे आजच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी केले. मळा -पणजी येथील पीपल्स हायस्कूलच्या संस्थापक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पीपल्स एज्युकेशनल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल देशपांडे, विश्वस्त शिल्पा देशपांडे तसेच पीपल्सच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

 


दामोदर मावजो पुढे म्हणाले की, शिक्षणाद्वारे आपल्या आत्म्याचे उन्नयन झाले पाहिजे. फक्त अभ्यासच नव्हे तर कला व क्रीडा या घटकांनी युक्त तेच खरे परिपूर्ण शिक्षण होय. कारण शिक्षण आपल्याला वास्तव , कला सौंदर्य तर खेळ शिस्तीचे महत्त्व शिकवतात हे लक्षात घेतले पाहिजे. पुस्तकांच्या पलिकडेही जीवनात शिकण्यासारखे बरेच काही असते हे पटवून देण्यासाठी मावजो यांनी बहिणाबाई चौधरी, जॉर्ज बर्नार्ड शॉ, शणै गोंयबाब , रघुनाथ माशेलकर यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.
जीवनात मार्गक्रमण करत असताना आजच्या युवा पिढीने आपली “माता, मातृभाषा व मातृभूमी ” या तीन घटकांना कधीही विसरू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. भविष्यात “एआय” ची व्याप्ती वाढत जाणार असल्याने आजच्या पिढीने सजग राहायला हवे, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रारंभी पीपल्स हायस्कूलचे संस्थापक मंगेश सुर्लकर यांच्या ११७व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मार्च २०२५च्या दहावी -बारावीच्या परीक्षेत सुयश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यांत अस्मी वाडजी, विपुला उसगांवकर, साईशा फातर्फेकर, समा नाईक गांठे, वैभव शिरोडकर, सान्वी जोशी , सावनी सिनारी, श्रुती नाईक , नताशा सलमानी, गौरांग पेडणेकर व योगेश कुमार यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा दळवी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय राहुल देशपांडे, सूत्रसंचालन मनिषा तळेकर यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्या रत्ना सरदेसाई यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें