🕉️
*अखंड, प्रचंड पुरुषार्थ!* – गुरु मंत्र.
“आपल्या सनातन हिंदू धर्मात गुरु-शिष्य परंपरेत अनन्य साधारण असं महत्व लाभलेला दिवस,म्हणजेच *गुरुपौर्णिमा* ! आपल्या परिवारतर्फे रविवार दिनांक १३ जुलै रोजी दवर्ली- मडगाव येथील *श्री दुर्गा माता देवस्थान* सभागृहात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.यावेळी होम-हवन नी मंत्रोच्चाराच्या सुक्ष्म वातावरणात व्यासपीठावरील परम पूज्य योग महर्षि पतंजली मुनी, परम पूज्य योग ऋर्षि स्वामी जी व आदरणीय आचार्य बालकृष्ण जीं च्या तस्वीरांना नतमस्तक होत उपस्थित योगव्रती, पदाधिकारी गुरु बंधू-भगिनींनी पुष्पांजली अर्पण करत समर्पण केलं.
“समाजात जीवन जगत असताना गुरु मार्गावर एकनिष्ठ राहून योगाभ्यासाने स्वतःतले दोष निवारण करत, स्वतःच्या उन्नती बरोबरीनेच समाजाचं चरित्र घडविण्याच्या महान कार्यात आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. स्वतःच्या संसाराचा गाडा हाकताना अगदी प्रतिकुल परिस्थितीत देखील सेवाभावी वृत्तीने, मोठ्या उमेदीने, *स्व* मधल्या कष्टाळू वृत्तीचे पदोपदी दर्शन घडवत, समाज व पर्यायाने राष्ट्र हिताय जडणघडणीत मोलाचा हातभार लावला, अशा परमेश्वर रुपी हयात नी आज आपल्यात हयात नाहीत अशा योग प्रशिक्षकांचा, सद् आत्म्यांचा, गोमंतकात पहिल्या प्रथमच दखल घेत, गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत संपूर्ण परिवारातर्फे शाल, श्रीफळ, मानचिन्ह व सन्मानपत्र बहाल करत आहोत”, असे यावेळी आपले भारत स्वाभिमानचे राज्य प्रभारी आदरणीय श्रीमान कमलेश जी बांदेकर सर व्यासपीठावरून गौरवोद्गारले.
“परम पू्ज्यनीय स्वामीजींचा *”अखंड, प्रचंड पुरुषार्थ*! हा गुरु मंत्र आयुष्यभर जोपासत,समर्पित भावनेने योग विद्येच्या ज्ञानाने समाजाला ज्यांनी प्रशिक्षित केले, अशा पुण्य्त्मांचा आदर्श आपण सर्वांनी अंगिकारत, त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी,सतत कार्यरत राहाण्यासाठीचं ही पुढे ते म्हणाले.
*यावेळी स़ंपुर्ण गोमंतकातून स्वर्गीय सुभाष जी बोरकर(मरणोत्तर), श्रीमान सुधाकर जी नाईक, श्रीमान उमेश जी वारीक, श्रीमती कमलताई फुलारी जी, श्रीमती राखीताई पालेकर जी, सौ. मायाताई भाटकर जी आदि योगव्रतींना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.*
“झाडांची पानं-फळं जेव्हा झाडाला घट्ट धरून राहतात तेव्हा ती भरकटली जात नाहीत, परंतु एक एक करून जेव्हा खाली पडतात, सर्वत्र पसरतात, तेव्हा ती पायदळी तुडविली जातात. तसं आपलं होता नये. म्हणूनच तर आपण सर्वांनी आपल्या गुरुला घट्ट धरून परमार्थ साधला असता, स्वतःच्या जीवनाचे निश्चितच सार्थक होईल!” असं आपल्या महिला पतंजली योग समितीच्या राज्य प्रभारी आदरणीय सौभाग्यवती संध्याताई खानोलकर जी म्हणाल्या.
“जेव्हा आपण गुरु कार्यात झोकून देतो, तेव्हा आपल्यातल्या *स्व* ला महत्व न देता, उदात्त भावनेने ईश्वरी कार्यात समर्पित व्हावं. एखाद्यावेळी नाव उच्चारण्यात गफलत झाल्यास कुणी रूसण्याची गरज नाही. आपण सारे योगव्रती आहोत. तेव्हा आपल्या सद्गुरुंच्या आज्ञेनुसार ईश्वरी कार्यात सदैव कार्यरत राहीले पाहिजे”, असं आपले पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी आदरणीय श्रीमान विश्वास जी कोरगावकर सर म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोमंतक गौसेवक महासंघाचे सर्वेसर्वा तथा किसान सेवा समितीचे राज्य प्रभारी आदरणीय श्रीमान कमलाकांत जी तारी सर होते. सभागृहातील दैवी शक्तींच वातावरण आपल्यातल्या शांत,आध्यात्मिक वाणीने परम पूज्य स्वामीजींना वंदन करत, ॐ शांती च्या उच्चाराने पुनः एकवार जागॄत केलं. परम पूज्य स्वामीजींच्या कॄपाशिर्वादाने येत्या १-२ वर्षात आपल्या गोमंतभूमीत साकारास येणाऱ्या *योग भवन* बाबत माहिती देत, सदर वास्तू उभारणीसाठी सर्वांच योगदान महत्त्वाचे असल्याचे आवाहन करताच, आपले होम-हवन विभागाचे राज्य प्रमुख आदरणीय पोपटभाई जी पटेल, संरक्षक आदरणीय श्रीमान राघव जी शेट्टी सर तसेच आदरणीय पारीष जी खानोलकर नी भरघोस स्वरूपात देणगी जाहीर केली.
यावेळी व्यासपीठावर साधकांनी सांघिक तसेच वैयक्तिक भजन, गुरु गान,संस्कृत श्लोक, मारुती स्तोत्र,प्रभू श्रीरामचंद्र स्तुती, मंत्र पठण केले. सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. गीता ताई तांडेल जी व साथीस आपल्या नेहमीच्याच शैलीत ‘काळजाच्या भितरल्या कप्प्यातल्यान माय मोगाचो यौकार’ देणारे श्रीमान सुनिल जी देसाई यांनी केले. तर शेवटी आभारप्रदर्शन श्रीमान रामा जी नाईक यांनी केले. 🙏