*आगामी पर्यटन हंगामापूर्वी जुनासवाडा-मांद्रे येथील लोखंडी पादचारी पुलाची करणार दुरुस्ती : पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचे आश्वासन*
*पर्वरी, २२ जुलै, २०२५* – आगामी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी जुनासवाडा-मांद्रे येथील लोखंडी पादचारी पुलाची दुरुस्ती पूर्ण केली जाईल, असे आश्वासन माननीय पर्यटन मंत्री रोहन ए. खंवटे यांनी विधानसभेत दिले आहे.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना, मंत्री खंवटे यांनी सदर आश्वासन दिले आहे. आमदार आरोलकर यांनी पुलाच्या जीर्ण स्थितीमुळे स्थानिक आणि पर्यटकांना होणाऱ्या त्रासांबद्दल चिंता व्यक्त केली होती.
हा पूल २०२१ मध्ये जरी पूर्ण झाला असला तरी, तो आता खराब झाला आहे. ज्यामुळे विशेषतः जुनासवाडा आणि आसपासच्या भागातील रहिवाशांच्या दैनंदिन प्रवासावर, परिणाम झाला आहे. यामुळे लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश मर्यादित झाला असून स्थानिक पर्यटन अर्थव्यवस्थेवर आणि हंगामी पर्यटकांवर अवलंबून असलेल्या लोकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम होत आहे. लोखंडी पादचारी पुलाची दुरुस्ती आणि त्याच्या पूर्णत्वामुळे मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर अखंड प्रवेश पुनर्संचयित होईल तसेच रहिवासी व पर्यटकांची हालचाल देखील सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.