मराठी राजभाषा आंदोलनाची ताकद वाढवण्यासाठी

.

: मराठी राजभाषा निर्धार समिती, गोवा : दि. २१ जुलै, २०२५.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
■ “मराठी राजभाषा आंदोलनाची ताकद वाढवण्यासाठी गोवाभर २० मराठी मातृशक्ती संमेलने आणि २० “मराठीयुवा” संमेलने येत्या ५ महिन्यात मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे आयोजित करण्यात येतील “अशी घोषणा राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी आज ” मराठी मातृशक्ती”च्या कार्यारंभ बैठकीच्या समारोपप्रसंगी केली.
मराठी राजभाषा निर्धार समितीच्या ” मराठी मातृशक्ती” या स्वतंत्र संघटनात्मक महिला युनिटचा ” कार्यारंभ ” आज ज्येष्ठ मार्गदर्शक गो.रा.ढवळीकर यांच्या हस्ते प्रतिकात्मक दीप प्रज्वलित होऊन करण्यात आला.


फोंडा येथील थ्रिफ्ट सोसायटी सभागृहात झालेल्या या कार्यारंभात गोव्यातील १८ प्रखंडातील प्रमुख निवडक ४० महिलांची मराठी मातृशक्तीची गोवा राज्य समिती स्थापन करण्यात आली.
“मराठी मातृशक्ती”च्या राज्यप्रमुख डाॅ.प्रा.अनिता तिळवे यांनी याप्रसंगी मराठी राजभाषा चळवळीसाठी समितीने आपल्या सोयीने तयार केलेल्या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाप्रमुख व जिल्हासहाय्यकांची पुढिलप्रमाणे नियुक्ती घोषित केली:-
● उत्तर गोवा :
जिल्हाप्रमुख — ॲड. रोशन रविंद्र सामंत, म्हापसा.
सहाय्यक — शुभदा गजेंद्र कळंगुटकर, डिचोली.
● मध्य गोवा:-
जिल्हाप्रमुख — नीना राजेंद्र नाईक, पणजी.
सहाय्यक — चित्रा प्रकाश क्षीरसागर, ताळगाव
● दक्षिण गोवा:-
जिल्हाप्रमुख — पूर्णिमा वल्लभ देसाई, मडगाव.
सहाय्यक — विशाखा रुक्मेश देसाई, कुंकळ्ळी.
१० ऑगस्टपर्यंत प्रखंडांच्या ” मराठी मातृशक्ती समित्या” स्थापन करून त्यांच्या विस्तारातून गोवाभर ” मराठी मातृशक्ती”ची संमेलने घेण्याची योजना कार्यवाहीसाठी ,सदर बैठकीत निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी सविस्तरपणे मांडली.
प्रारंभी मार्गदर्शक गो.रा.ढवळीकर यांनी गोव्यातील मराठी राजभाषा चळवळीचा व उद्दिष्टांचा आढावा घेऊन “मराठी मातृशक्ती ” च्या कार्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
राज्य मराठी मातृशक्तीप्रमुख डाॅ.अनिता तिळवे यांनी केलेल्या बीजभाषणात गोव्यात मराठीचे स्थान व महत्व तसेच मराठी राजभाषा का झाली पाहिजे याचे तपशीलवारपणे विवेचन केले.
याप्रसंगी झालेल्या चर्चासत्रात रोशन सामंत, दीपा मिरिंगकर, अनुराधा मोघे,सोनम सावंत, नीना नाईक आदींनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन सोनम सावंत यांनी केले.
सामूहिक पसायदानाने बैठक संपली—

● सुभाष भास्कर वेलिंगकर
राज्य निमंत्रक

■■■■■■

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें