गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ: पर्यटन मंत्री खंवटे*

.

*गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ: पर्यटन मंत्री खंवटे*

*पर्वरी, २४ जुलै २०२५*: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वृध्दी झाल्याची, माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी गोवा विधानसभेच्या चालू अधिवेशनात आज दिली.

गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याबाबत प्रश्नोत्तराच्या तासात कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी राज्य विधानसभेत केलेल्या दाव्याचे त्यांनी आकडेवारी सादर करून पुराव्यासह खंडन केले.

राज्य आणि केंद्र सरकारच्या जोरदार प्रयत्नांमुळे आणि पुढाकारांमुळे गोव्याचे पर्यटन क्षेत्र वेगाने विस्तारत आहे, यावर मंत्र्यांनी भर दिला. *”विमाने आणि हॉटेल्स गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी जवळजवळ भरली आहेत. गोव्यातील लोक ही वाढ पाहत आहेत,” असे ते म्हणाले.*

जानेवारी ते जून २०२५ दरम्यान, गोव्यात एकूण ५७,१२,७५८ पर्यटकांचे आगमन झाले, ज्यामध्ये ३४,६४,४९० पर्यटक वास्को येथील गोवा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि २२,४८,२६८ पर्यटक मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आले. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ३,२५,८३५ होती, ज्यामध्ये १,१५,६४५ पर्यटक गोवा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि २,१०,१९० पर्यटक मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आले. गेल्या सहा महिन्यांतच दाबोळी आणि मोपा विमानतळांवर सातत्याने जास्त पर्यटकांची गर्दी दिसून आली आहे आणि हॉटेलमधील व्याप्ती वर्षभर ७०% ते १००% राहिली आहे, असे त्यांनी नमूद केले.

*मंत्री रोहन खंवटे यांनी अधोरेखित केले, की हा डेटा टुरिझम इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट एंटरप्राइज (टाईम) सॉफ्टवेअरद्वारे कॅप्चर केला जातो, जो राज्यभरातील हॉटेल्सना नोंदणी करण्यासाठी आणि हॉटेलमधील व्याप्तीचा अहवाल देण्यासाठी अनिवार्य आहे. “प्रत्येक हॉटेल टाईम सॉफ्टवेअर वापरत आहे. हा डेटा वास्तविक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाद्वारे एकत्रित केलेला आहे,” हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.*

राज्याने कोविडनंतर पर्यटन क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय प्रगतीचे दर्शन घडवण्यासाठी त्यांनी महामारीपूर्वीच्या आकडेवारीसह तुलनात्मक विश्लेषण देखील सादर केले. २०१९ मध्ये गोव्यात ७१,२७,२८७ देशांतर्गत आणि ९,३७,११३ आंतरराष्ट्रीय पर्यटकांची नोंद झाली होती, जी एकूण ८०,६४,४०० इतकी होती. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ९९,४१,२८५ देशांतर्गत आणि ४,६७,९११ आंतरराष्ट्रीय पर्यटकांची नोंद झाली, जी एकूण १,०४,०९,१९६ झाली.

*कोविडपूर्व स्थितीच्या तुलनेत ही देशांतर्गत पर्यटनात ३९.४८% वाढ आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात ५०% सुधारणा दर्शवते. “गोवा पूर्वीपेक्षा अधिक मजबूतीने पुढे आला आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते, की गोव्यात पर्यटन भरभराटीला येत आहे,” असे मंत्री खंवटे यांनी ठामपणे सांगितले.*

पर्यटन क्षेत्रात सुरु असलेल्या चांगल्या कामाबद्दल आमदार, श्री मायकल लोबो यांनी माननीय पर्यटन मंत्र्यांचे कौतुक केले.

*राज्याबाहेरून चुकीची माहिती पसरवणाऱ्या “पेड इन्फ्लुएंसर” बद्दल त्यांनी कडक शब्दांत टीका केली. श्री. खंवटे म्हणाले, की “हे इन्फ्लुएंसर आवाज निर्माण करण्यासाठी आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी पैसे घेतात. परंतु जेव्हा आम्ही अधिकृत डेटा सादर केला तेव्हा त्यापैकी कुणीच त्याचा प्रतिकार केला नाही.” या टीकाकारांना आव्हान देत ते पुढे म्हणाले, की “पर्यटकांमध्ये जर घट झाली असेल तर पुरावे दाखवा. आमच्याकडे लपवण्यासाठी काहीही नाही, आकडे स्वतःच बोलतात.”*

त्यांनी पुढे भर दिला, की गोव्याने कोविडनंतरच्या पुनर्प्राप्तीमध्ये इतर राज्यांना मागे टाकले असल्याने गोव्यातील लोकांनी पर्यटन क्षेत्राबद्दल सकारात्मक कथन करण्यात सहभागी व्हावे व यासाठी प्रोत्साहन द्यावे.

*श्री. खंवटे यांनी गोव्याच्या वाढत्या जागतिक पोहोचेबद्दल देखील सांगितले. त्यांनी अधोरेखित केले, की राज्याने पोलंड, उझबेकिस्तान आणि कझाकस्तानसारख्या नवीन पर्यटन बाजारपेठांमध्ये प्रवेश केला आहे. उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय जाहिरातींमुळे हे संबंध वाढण्यास मदत झाली आहे*. “गोवा आता जगाच्या अनेक भागांशी जोडलेला आहे,” असे ते म्हणाले, रोड शो आणि मार्केटिंग मोहिमांसारख्या प्रयत्नांमुळे पूर्वी नसलेले पर्यटन विभाग देखील आता खुले झाले आहेत.

त्यांनी असेही सांगितले, की पर्यटन खात्याने विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाशी (एफआरआरओ) संपर्क साधला आहे आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमनाचा डेटा लवकरच औपचारिकरित्या समाविष्ट करून सामायिक केला जाईल.

*”गोव्यात पर्यटन योग्य दिशेने वाटचाल करत आहे,” असे सांगताना मंत्री खंवटे यांनी, सर्व भागधारक आणि गोव्यातील लोकांना या क्षेत्राला वाढीला पाठिंबा देण्याचे आणि निराधार नकारात्मकतेचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले आहे.*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें