फळदेसाई यांनी कुंभारजुवा मतदारसंघातील सांस्कृतिक उत्सवांसाठी पुरेसा निधी देण्याची केली मागणी

.

फळदेसाई यांनी कुंभारजुवा मतदारसंघातील सांस्कृतिक उत्सवांसाठी पुरेसा निधी देण्याची केली मागणी

पणजी : कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी मंगळवारी पर्यटन खात्याकडे त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्सवांसाठी पुरेसा निधी मंजूर करण्याची मागणी केली. यामध्ये दिवाडीचा ‘बोंदेरा’ कुंभारजुव्याचा ‘सांगोड’ आणि अशाच प्रकारच्या अन्य उत्सवांचा समावेश असून सध्या हे उत्सव मर्यादित निधीत साजरे केले जात आहेत.
पर्यटन खात्याच्या अनुदान विषयक चर्चेदरम्यान फळदेसाई म्हणाले, माझ्या मतदारसंघातील उत्सव हे कुठल्याही मोठ्या उत्सवांपेक्षा कमी नाहीत आणि त्यांना खात्याकडून योग्य वागणूक मिळायला हवी. मोठ्या आणि छोट्या बोंदेरांसाठी तुम्ही पुरेसा निधी द्यायलाच हवा. बोंदेरांचा खर्च किमान ८० लाखांचा असतो. आपण चिखलकाल्यावर १.५ कोटी खर्च केले, जिथे याच तर्‍हेचा वारसा आणि परंपरा साजरी केली जाते, असे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, फळदेसाई यांनी कुंभारजुव्याच्या सांगोड उत्सवावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता सांगितली. गेल्या वर्षी या उत्सवात एक नौका उलटून तिचे प्रवासी नदीत पडले होते.
सांगोड उत्सवासाठी २३ ते ३० हजार लोक ये-जा करतात. अतिशय सुंदर सांगोड असतो. त्यासाठी २५ ते ३० लाखांचा निधी मिळायलाच हवा.
आम्हाला दोन फायबर बोटी द्या. गेल्यावेळी बोट उलटली, सुदैवाने कुणालाही काही झाले नाही. काही जीवरक्षक द्या. त्यामुळे यावर्षी चिंता मिटेल, असेही ते म्हणाले.
फळदेसाई यांनी ओल्ड गोव्यातील ‘प्रसाद’ योजनेच्या स्थितीबाबतही प्रश्न उपस्थित केला, जी योजनेची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी झाली होती.
ओल्ड गोव्यात ‘प्रसाद’ योजनेची पायाभरणी आपण दोन वर्षांपूर्वी केली. पण त्यानंतर काहीही झाले नाही, कुठलीही माहितीही नाही. अडचण काय आहे? पंतप्रधानांनीच या योजनेची पायाभरणी केली होती, असेही ते म्हणाले.
हे फक्त किनारे किंवा आंतरिक भाग नाही, तर सर्वाधिक पर्यटक ओल्ड गोव्यात येतात. दररोज सुमारे १५,००० ते २०,००० पर्यटक ‘गोंयचो सायब’च्या दर्शनासाठी येतात, असे ते पुढे म्हणाले. त्यांनी पर्यटन खात्याने गाव पंचायतीकडे पार्किंग व्यवस्थापन सोपवावे, जेणेकरून पंचायतीला उत्पन्न मिळेल, अशी मागणीही केली.
शेवटी, फळदेसाई यांनी दिवाडी बेटावरील पर्यटकांसाठी आकर्षणे विकसित करण्याची मागणी केली, ज्यात दिवाडी चर्चचा समावेश आहे. जिथून संपूर्ण तिसवाडी तालुका दिसतो. तसेच बोटींची सुविधा उपलब्ध करून द्यावी, कारण दिवाडीला येणारे बहुतांश पर्यटक हे मासेमारी आणि शेतीच्या अनुभवासाठी येतात, असेही त्यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें