दिनांक : १०.०८.२०२५
हिंदु जनजागृती समिती स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानचा ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’उपक्रम
राज्यभर प्रशासन, पोलीस आणि विद्यालये या ठिकाणी केले प्रबोधन
पणजी, १० ऑगस्ट – हिंदु जनजागृती समिती स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यभर ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत विविध विद्यालयांचे व्यवस्थापन, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती आणि विक्री करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे करण्यात येत आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्या २२ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत यंदा म्हापसा, तिसवाडी, पेडणे, फोंडा, वाळपई, डिचोली वास्को आदी ठिकाणातील विद्यालयांचे व्यवस्थापन, प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी यांना याविषयी निवेदने देण्यात आली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.
आपला नम्र,
डॉ. मनोज सोलंकी, गोवा राज्य, समन्वयक
हिंदु जनजागृती समितीकरिता, (संपर्क : ९३२६१०३२७८)