भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न

.

पणजी   भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्या मार्गाचे ध्येयएकच होते आणि ते म्हणजे भारताची स्वातंत्र्य! देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी म्हणून प्रबोधन शिक्षण संस्था संचालित प्रबोधन प्राथमिक विद्यालयात ७९व्या स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेतील कार्यक्रमाला श्री. सुबोध बोरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतमातेच्या फोटोचे पूजन व दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ध्वजप्रणाम केला. राष्ट्रगीत व ”हा देश माझा” या बोलाचे देशभक्तीगीत सादर केले. शाळेतील प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी कु. काव्या रुपेश पोरोब, चि. निहित चोडणकर, कु.श्रीलेखा महाबळेश्वर भोसले व कु. आव्या परेश वळवईकर यांनी भाषणे सादर केली.

कार्यक्रमाला सौ. रेश्मा हळदोणकर, रोटरी कल्ब ऑफ पर्वरी ब्लेज़ चे माजी अध्यक्ष श्री. हरी कौल, पोंबुर्फा वळावली गावचे माजी सरपंच श्री. विनय चोपडेकर, उपनगर नियोजन खात्याचे अधिकारी श्री. जयदेव हळदोणकर, स्वतंत्र सैनिकांचे बंधु श्री. हनुमंत चोडणकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. भुपाल फडते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत सुनंदा मसुरकर बाईने केले. कार्यक्रम शिक्षिका सौ. मीना गायकर, कु. प्रीती गावकर, सौ. गीता होडके, शिक्षिकेतर कर्मचारी श्री. निलम नाईक यांच्या उपस्थितीत झाला. कु. संतोषी मांद्रेकर बाईंच्या आभार प्रदर्शनानंतर व खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें