सयाजी हॉटेल्सकडून ‘एफोतेल बाय सयाजी पणजी’सह गोव्यात नवीन मालमत्तेचे लाँच* ~ भारतातील आवडत्या मनोरंजन स्थळी एक आधुनिक बिझनेस हॉटेल ~

.

*सयाजी हॉटेल्सकडून ‘एफोतेल बाय सयाजी पणजी’सह गोव्यात नवीन मालमत्तेचे लाँच*

~ भारतातील आवडत्या मनोरंजन स्थळी एक आधुनिक बिझनेस हॉटेल ~

*गोवा, २१ ऑगस्ट २०२५* – सयाजी हॉटेल्सने *एफोतेल बाय सयाजी, पणजीच्या* लाँचसह गोव्याच्या राजधानीत पाऊल ठेवल्याची अभिमानाने घोषणा केली आहे. आजच्या विवेकी प्रवाश्यांसाठी डिझाइन केलेले हे एक बुटीक बिझनेस हॉटेल आहे. यात मैलाचा दगड म्हणजे, या ब्रँडची पणजीच्या व्यवसाय केंद्रातील ही पहिली मालमत्ता आहे, जी भारतातील सर्वात उत्साही पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गोव्यात, आपले आधुनिक आदरातिथ्य आणि सेवेचे मिश्रण सादर करते.

गोव्याचे हृदय असलेल्या पणजीतील डॉ. आत्माराम बोरकर मार्गावर धोरणात्मकदृष्ट्या स्थित, एफोतेल पणजी हे दाबोळी विमानतळ (२७ किमी), मोपा विमानतळ (३४ किमी) आणि करमळी रेल्वे स्टेशन (१३ किमी) या ठिकाणांना अखंड जोडणी पुरवते. मध्यवर्ती जागेत स्थित असल्याने सरकारी कार्यालये, व्यवसाय केंद्रे, सांस्कृतिक खुणा आणि गोव्याला जगप्रसिद्ध बनवणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर येथून सहज प्रवेश सुनिश्चित होतो.

या हॉटेलमध्ये डिलक्स, सुपीरियर आणि प्रीमियम या तीन श्रेणींमध्ये विचारपूर्वक डिझाइन केलेल्या ४८ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत स्मार्ट सुविधा आणि समकालीन इंटीरियर एकत्रित केले आहे, जे केंद्रित व्यवसायिक मुक्काम आणि आरामदायी विश्रांतीच्या वेळी, परिपूर्ण संतुलन साधण्यास पूरक ठरते.

एफोतेल पणजी देत असलेल्या सेवांच्या केंद्रस्थानी ‘द क्यूब’ हे खास व दिवसभर चालणारे डायनिंग रेस्टॉरंट आहे, जे जागतिक आणि गोव्यातील चवींचा प्रेरित मेनू देते. शेजारील बार एक उत्साही सामाजिक वातावरण तयार करतो, ज्यामुळे हॉटेल रहिवासी आणि पर्यटक दोघांसाठी हे एक नवीन जेवणाचे ठिकाण बनते. अतिथी छतावरील स्विमिंग पूलमध्ये शहराच्या विहंगम दृश्यांसह आराम करू शकतात किंवा स्पामध्ये पुन्हा तजेलशीर होऊ शकतात, हे पणजीच्या गजबजाटातून शांततेत सुटका देते.

“पणजीतील एफोतेल बाय सयाजीसोबत आम्हाला गोव्यात विचारशील आदरातिथ्य, आधुनिक डिझाइन आणि क्युरेटेड अनुभवांच्या सयाजी ब्रँडच्या गुणविशेष सेवा आणताना आनंद होत आहे. ही मालमत्ता केवळ भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आमचा ठसा बळकट करत नाही तर व्यवसाय व आराम शोधणाऱ्या प्रवाशांना समानतेने प्रतिसाद देणारी ठिकाणे तयार करण्याच्या, आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब देखील दर्शवते,” असे *कॉर्पोरेट व्यवसाय विकास प्रमुख सुमेरा धनानी* म्हणाल्या.

“गोव्याकडे नेहमीच एक आरामदायी बाजारपेठ म्हणून पाहिले जाते, परंतु पणजीचे व्यवसाय केंद्र म्हणून वाढत्या महत्त्वासह, एफोतेल पणजी आमच्या पाहुण्यांसाठी दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी घेऊन येते,” असे *अन्वर हसन ग्रुपचे संचालक, सरफराज शेख* म्हणाले.

“गोव्यातील आमचे हे पहिले हॉटेल असल्याने हे लाँच, धोरणात्मक विस्तार आणि राज्यातील आदरातिथ्य अनुभव वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करते. आम्हाला विश्वास आहे, की एफोतेल पणजी हे गोव्याच्या राजधानीला भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी पसंतीचा पर्याय बनेल,” असे *सयाजी ग्रुपचे ऑपरेशन्स संचालक राजेंद्र जोशी* म्हणाले.

आधुनिक डिझाइन, पाककृती हायलाइट्स आणि व्यवसाय व आरामदायी सेवांमधील संतुलन यामुळे, एफोतेल पणजी हे गोव्याच्या राजधानीत आदरातिथ्याला पुन्हा परिभाषित करण्यास सज्ज आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें