पेडणे सोहिरोबानाथ आंबीये संघाला
गोवा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद
*कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने १२ वर्षानंतर रचला इतिहास*
*संघाने सर्व सामने एकतर्फी जिंकले*
पणजी, दि
गोवा विद्यापीठ आयोजित राज्य स्तरीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी २०२५ स्पर्धेचे जेतेपद पेडणे संत सोहिरोबानाथ आंबीये महाविद्यालयाने पटकावले.
कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघाने पेडणे महाविद्यालयाला तब्बल बारा वर्षानंतर पुन्हा राज्य स्तरीय विजेतेपद पटकावून इतिहास रचला. गोवा विद्यापीठ कबड्डी स्पर्धेत राज्यातील एकूण अठ्ठावीस महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला होता.
बांबोळी पणजी येथील शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर मैदानावर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात संत सोहिरोबानाथ आंबीये संघाने म्हापसा येथील सेंट झेवीयर्स महाविद्यालय संघावर ५९ विरुद्ध ३२ अशा मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला.
साखळी फेरीपासुन उत्कृष्ट कामगिरी बजावत संपूर्ण स्पर्धेत पेडणे महाविद्यालयाने आपले वर्चस्व निर्माण केले होते. पर्वरी विद्या प्रबोधिनी संघाला ६७-३६, फोंडा पी ई एस संघाला ४०-२०, गोवा विद्यापीठ संघाला ५०-२५ अशा फरकाने सहज हरवून अंतिम सामना गाठला होता.
पेडणे सं.सोहिरोबानाथ आंबीये म्हविद्यालयाच्या विजयात कर्णधार भार्गव मांद्रेकर, ए जी कार्तिक, संचित गावस, अभिजित पोतदार, विनय गाड, आदित्य शेट्ये, यज्ञेश सावळ देसाई, अनिकेत केरकर, मुकुंद मटकर, श्रेयश नाईक, रजत वरक, आकाश ससनूर, नवसो नाईक, पुष्पराज सातार्डेकर यांचा सहभाग होता.
फोटो
बांबोळी शामाप्रसाद मैदानावर राज्य स्तरीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेतील विजेतेपदाचे चषक स्वीकारताना पेडणे संत सोहिरोबानाथ आंबीये कबड्डी संघाचा कर्णधार भार्गव मांद्रेकर. सोबत मान्यवर व खेळाडू.