शिवोली येथील डॉ. स्नेहल गोलतेकर यांच्या बागेतच प्रथमच जपान येथील मायाजॅकी या आंबाची कलम लावण्यात आली. खास कलकत्ता येथून आणलेले या आंबाची आतरराष्ट्रीय बाजार पेठेत किंमत दिड लाख असून रेशमा गोलतेकर यांच्या हस्ते व कृषी अधिकारी संपत्ती पासैकर यांनी हि रोपटी लागली. यावेळी राजेश धारगळकर यांनी या आंबाची माहिती देताना सांगितले की मायाजॅकी आंबा याची प्रथमच गोवात आणि तेही शिवोली येथे रोपटे लावण्याचा मान मिळाला आहे ही एक चांगली गोष्ट आहे. रूबेल हुसेन यानें खास कलकत्ता येथून हे आंबाची कलमे आणली त्याबद्दल त्याचे आभार मानण्यात आले या वेळी राजेश धारगळकर, महेंद्र नाईक पेडणेकर, कृषी अधिकारी संपत्ती पासैकर डॉ, स्नेहल गोलतेकर, चूराजी मादेंकर, रेशमा गोलतेकर आदी उपस्थित होते.