पर्रा सिटीझन फोरम असोसिएशन तर्फे अखिल गोवा पातळीवर तसेच कळंगुट मतदार संघ मर्यादित 7 वी भव्य आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत फक्त लाकडी काठ्या व कागदापासून केलेल्या पारंपरिक आकाश कंदीलाना सहभागी होता येईल अशी माहिती फॉरमचे अध्यक्ष प्रा. प्रदीप मोरजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्या निवास्थानी आयोजित या पत्रकार परिषदेला स्पर्धेचे पुरस्कर्ते मंत्री मायकल लोबो, पर्रा च्या सरपंच डिलायला लोबो, जिल्हापंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, माजी सदस्य मनोज कोरगावकर, तसेच कळंगुट मतदार संघातील व शिवोली मतदार संघातील विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेत अखिल गोवा करिता पहिले बक्षीस रु.30000/- तर कळंगुट मतदार संघ मर्यादित करिता पहिले बक्षीस रु.25000/- असून इतरही प्रत्येकी दहा उत्तेजनार्थासह एकूण अठरा अश्या भरघोस बक्षीसाबरोबरच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना रु 500/- व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. ही स्पर्धा दि.31 ऑक्टोबर 2021 रोजी पर्रा तिठो येथे घेण्यात येणार आहे, स्पर्धेत सहभागाकरिता दि.28 ऑक्टोबर पर्यत नाव नोंदणी करणे गरजेचे असून ऑनलाईन नावनोंदणी करिता व इतर माहिती करिता इच्छुक स्पर्धकांनी प्रदीप 9822139319, शिवराम 9822137663, जनार्दन 9850191051, बाली 9822988837 यांच्याशी संपर्क साधावा असे मोरजकर यांनी सांगितले.
गेल्या वर्षी कोवीड महामारीच्या उद्रेकामुळे स्पर्धा घेता आली नव्हती पण त्या अगोदर च्या वर्षी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला होता, संपूर्ण गोव्यातून सर्व धर्माचे दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. दिवाळी हा दिव्याचा सण, तो आणखी प्रकाशमान व्हावा म्हणून व पारंपरिक आकाश कंदील करण्याकरिता प्रोत्साहन मिळावे म्हणून स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे असे मंत्री लोबो यांनी सा�
पर्रा येथे भव्य कंदील स्पर्धा
![IMG-20211019-WA0090](https://aizgoanews.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211019-WA0090-1068x801.jpg)
.
[ays_slider id=1]