शिवोली मतदार संघातीलच नव्हे तर गोव्यातील सर्व शाळेतील मुलांना चांगल्या साधन सुविधा मिळण्याची गरज आहे, शाळांना मिळणारे अनुदान खूप कमी आहे, त्यात वाढ करण्याची गरज आहे, त्या करिता पुढील कार्यकाळात त्या करिता आपण प्रयत्न करण्याकरिता कटिबद् असल्याचे प्रतिपादन बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी वागातोर येथे केले.
वागातोर येथील होली फॅमिली ऑफ नाझारेथ सांकोळे गोवा संचालित सेंट मायकल कॉन्व्हेंट हायस्कुल मध्ये उभारण्यात आलेल्या फा. फाऊस्तो चिल्ड्रेन पार्क चे उदघाट्न मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदर चिल्ड्रेन पार्क शाळेसाठी पुरस्कृत करणाऱ्या पर्रा पंचायतीच्या सरपंच डिलायला लोबो, संस्थेच्या सचिव रेव्ह. मारिया सॅड्रा रॉड्रिग्स, वागातोर चर्च चे फादर मार्सेलीन डिसोझा, शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर सॅल्वासाव, मुख्याध्यापिका सिस्टर मार्गरेट, हणजूण कायसूव पंचायतीचे पंचसदस्य सर्वस्वी सुरेंद्र गोवेकर, हनुमंत गोवेकर, शीतल दाभोळकर उपस्थित होते.
मुलांना योग्य वेळी योग्य शिक्षण मिळायला पाहिजे.मुलांचा शाळेतील शिक्षणाचा पाया भक्कम झाला तर राष्ट्र मजबूत होते याकरिता शाळेतील साधन सुविधा सुधारण्याची गरज आहे, शिवोली मतदार संघातील शाळांना पुढील काळात ईलायब्ररी, चांगले टॉयलेट पुरवण्यास कटिबद्ध असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले.ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेला आपण देणे लागतो म्हणून त्याच संस्थेच्या या शाळेला आपण हे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिले असे डिलायला लोबो यांनी सांगितले.
फोटो ……… वागातोर येथील सेंट मायकल शाळेत उभारण्यात आलेल्या चिल्ड्रेन पार्क चे उदघाट्न करताना मंत्री मायकल लोबो, सोबत डिलायला लोबो, व इतर मान्यवर……….. ( रमेश नाईक )