हणजूण ग्रँड चिवार येथील 18 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नाला बांधकामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
शिवोली मतदार संघातील हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रात आतापर्यत आपण बरीच विकासकामे केली आहेत, विकासकामे करताना आपणाला स्थानिक पंचायतीनेही आपणाला चांगले सहकार्य केले, काही राहिलेली विकासकामे येत्या महिन्यात पूर्ण होतील, या नाल्याच्या बांधकामाची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत होती, जलस्रोत खात्यामार्फत शंभर मीटर च्या नाल्या चे बांधकाम साधारण तीन महिन्यात पुर्ण होईल असे आमदार पालयेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी गाववाडी प्रभागाचे पंच सदस्य पेद्रो मेंडोसा, माजी पंच सदस्य दत्ता कलंगुटकर, प्रभाकर गोवेकर, राजन कलंगुटकर, अशोक तोडणकर, नारायण कलंगुटकर, नंदेश मालवणकर, नक्षत्री तोडणकर, श्रीमती कलंगुटकर आदी ग्रामस्थ उवस्थित होते.
फोटो ……… हणजूण ग्रँडचिवार येथील नाला बांधकामाचा शुभारंभ करताना आमदार विनोद पालयेकर, सोबत स्थानिक ग्रामस्थ……… ( रमेश नाईक )